खासदार सुप्रिया ताई सुळे यांचा मळद गावभेट दौरा
बारामती : लोकसभा मतदारसंघातील कार्यक्षम व लोकप्रिय खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी दि.26 रोजी आपला गावभेट दौरा मळद गावापासुन सुरू केला.
यावेळी सोबत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नाना पाटील देवकाते, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री संभाजी नाना होळकर, माळेगांव सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सागर जाधव, मदनराव देवकाते, उपाध्यक्ष रामचंद्र नाना मदने, दुधसघं चेअरमन संदीप जगताप धनवान वदक, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे अध्यक्ष दादा राम झगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविक पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे कार्याध्यक्ष श्री नितीन दादा शेंडे यांनी केले. स्वागत सरपंच श्री योगेश बनसोडे व उपसरपंच किरण गावडे यांनी केले. यावेळी ताईंचा सत्कार ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. सुनिता ताई त्र्यंबक सातव, सौ सारिका ताई शैलेश पिसाळ, सौ आशाताई दगडू लोंढे, सौ आशाताई कल्याण मोहि यांनी केले.
या वेळी बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ताईंनी आपुलकिने विचार पुस केली. ग्रामस्थांशी सवांद साधला. महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे असे सांगीतले. यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
अजंठा वेरूळ लेणी सारखे पुरातन दगडावरील अत्यंत सुंदर नक्षीकाम मळद गावातील वाघेशवर मंदिरात आहे हे पहायला पर्यटकांनी आले पाहीजे.असे मनोगत यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यक्षम खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी आज मळद येथे बोलताना केले. मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणी मंदिराचे पुरातन दगडि नक्षीकाम पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.
आगामी काळात या क्षेत्रातील तज्ञ लोकांना पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.