महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

दि. ७ मार्च २०२४ रोजी पुणे शहरातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि मित्र परिवार यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन - अ.भा.म. चि. म. अध्यक्ष मा. श्री. मेघराजराजे भोसले यांची माहिती.

दि. ७ मार्च २०२४ रोजी पुणे शहरातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि मित्र परिवार यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन - अ.भा.म. चि. म. अध्यक्ष मा. श्री. मेघराजराजे भोसले यांची माहिती.
March 05, 2024 12:42 PM ago Pune, Maharashtra, India

पुणे : पुणे परिसरातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ यांच्या असलेल्या अडचणी आणि पुणे व पुणे परिसरात जास्तीत जास्त चित्रपट क्षेत्रात रोजगार निर्मिती करण्यासाठी आपले म्हणणे थेट सरकार दरबारी मांडण्याची व्यवस्था करण्याच्या अनुषंगाने सर्व कलाकार व तंत्रज्ञ व इतर संबंधितांचा स्नेह मेळावा, गप्पा टप्पा व सहभोजनाचे आयोजन केले असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा. श्री. मेघराजराजे भोसले यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी मा. श्री. प्रवीण विठ्ठल तरडे (लेखक, दिग्दर्शक,अभिनेते), मा. श्री. मुरलीधर(अण्णा) मोहोळ (मा. महापौर, पुणे / सरचिटणीस भाजपा), मा. श्री. मेघराजराजे भोसले (अध्यक्ष - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ) हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे, तरी पुणे परिसरातील चित्रपट क्षेत्रातील संबंधितांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे .


तरी हेच निमंत्रण समजुन सर्वानी उपस्थित राहावे.

दिनांक : गुरुवार ७ मार्च २०२४ रोजी.

स्थळ : शुभारंभ लॉन्स, डी. पी. रोड , कोथरुड.

वेळ : सायंकाळी 6 ते सहभोजन संपेपर्यंत.

निमंत्रक: पुणे शहरातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि मित्र परिवार.

संबधित बातम्या