नमो महारोजगार नव्हे हा तर संभाव्य मतदार मेळावा.

काळ्या कलरच्या ब्रँड असणारया कंपन्यानाच प्रवेश नाकारला, महारोजगार मेळावा नसुन येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी तरुण मतदारांचा राजकीय मेळावा.
बारामती दि. 2: आज बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले असुन या महारोजगार मेळाव्यासाठी राज्यातून नामांकीत कंपन्या आल्या असुन विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन त्यांना रोजगार देणार देणे हा या मेळाव्याचा खरा उद्देश आहे, पण या मुख्य उद्देशाला हरताळ फासुन हा महारोजगार मेळावा नसुन येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी तरुण मतदारांचा राजकीय मेळावा आहे असं चित्र दिसत आहे.
या मेळाव्यात मुख्य कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहे पण जो पर्यंत हे मुख्य नेते उपस्थित आहेत तो पर्यंत काळ्या कलरच्या ब्रँड असणारया कंपन्याना प्रवेश देऊ नका असे आदेश शासनाने पोलिस यंत्रनांना दिले आहेत.
हे फक्त कंपन्याना बाबतीतच नाहीत पण जे विद्यार्थी, त्यांना घेऊन येणारे कॉलेजचे प्रतिनिधी, पत्रकार बांधव व मुस्लिम समाजातील रोजगार इच्छुक युवती ज्या काळा बुरखा घालुन आल्या आहेत त्यांनाही प्रवेश नाकारताना दिसत आहे यावरुन सत्ताधारी नेत्यांना काळे झेंडे किंवा काळे कपडे दाखवण्याची भिती वाटत असुन हा फक्त नावापुरता महारोजगार मेळावा असुन राष्ट्रवादी(अजित पवार गट), शिवसेना(एकनाथ शिंदे गट) व भाजपचा राजकीय अजेंडा दिसत आहे.
महाराष्ट्र सोशल मिडीया, प्रतिनिधी.