महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

वीज बिलांवर त्वरीत तोडगा काढा नाहीतर खुर्ची खाली करा- शितलताई साबळे.

मा. दत्ता मामा भरणे यांच्या राजीनाम्याची मागणी.
वीज बिलांवर त्वरीत तोडगा काढा नाहीतर खुर्ची खाली करा- शितलताई साबळे.
March 18, 2021 11:38 AM ago Indapur, Maharashtra, India

इंदापुर: कोरोनाच्या संकटामुळे सर्व जण हवालदिल झाले असुन त्यात भरमसाठ वीजबीलामुळे आणखीन खिशाला ओढ बसत आहे. महाराष्ट्र शासनाने स्थगीत केलेली वीज तोडणी पुन्हा सुरू करुन वीज बिल भरण्यासाठी जनतेला भाग पाडले जात आहे.

इंदापुर तालुक्याच्या बहुतांश ठिकाणी वीज कनेक्शन तोडणी चालु असुन पिकांना पाणी मिळत नाही त्यामुळे हातची पिके डोळ्यासमोर जळुन जात आहे. त्यामुळे वीज तोडणी स्थगित करुन लवकरात लवकर तोडणी केलेली कनेक्शन बसवून वीज बीलावरती तोडगा काढावा.

इंदापुर तालुक्याचे प्रतिनिधी मा. श्री. दत्ता मामा भरणे तालुक्यात कोटींच्या कोटी निधी आणल्याच्या बाता मारतात पण जर त्यांना तालुक्यातील जनतेच्या वीज बीलावरती तोडगा काढता येत नसेल तर त्यांना तालुक्याचे प्रतिनिधीत्व करता येत नाही असे समजुन त्यांनी राजीनामा देऊन मंत्रीपदाची खुर्ची खाली करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा महिला मोर्चा सदस्या शितल ताई साबळे यांनी केली.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, इंदापूर तालुक्यातील प्रतिनिधी श्री.दत्ता मामा भरणे यांचा मी जाहिर निषेध करते. किती वेळा, ज्या जनतेनी तुम्हाला मंत्री पदावर बसवले त्यांना फसवणार आहेत. वीज बिलाविषयी गरीब शेतकऱ्यांना किती फसवनार. प्रत्येक शेतकरी या मामाच्या आशेवर काहीतरी करतील म्हणून बसलेत आणि हे मामा फक्त कामा पुरतेच झालेत. कामा पुरते मामा ज्या शेतकऱ्यांकडे वीज बील भरायला पैसे नाहीत ते कुठून भरणार त्याचे उत्तर जनतेला द्या. नाहीतर खुर्ची खाली करा.

संबधित बातम्या