महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

जागतिक पर्यावरण दिनी मिशन ग्रीन पुसदचा शुभारंभ. स्व. अनिल ठाकरे यांच्या स्मरणार्थ पहिले वृक्ष लावून शहर फुलविण्याचा केला संकल्प.

ठाकरे कुटुंबीयांनी मानले आयोजकांचे आभार
जागतिक पर्यावरण दिनी मिशन ग्रीन पुसदचा शुभारंभ. स्व. अनिल ठाकरे यांच्या स्मरणार्थ पहिले वृक्ष लावून शहर फुलविण्याचा केला संकल्प.
June 05, 2022 07:56 PM ago Pusad, Maharashtra, India

पुसद : ०५ जून अर्थातच जागतिक पर्यावरण दिवस या दिवसाचे औचित्य साधून पर्यावरण प्रेमी युवकांनी एकत्र येत गेल्या महिना भरापासून स्वप्नातील शहर हे ग्रीन पुसद कसे होईल यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. व त्याचा प्रत्यय शहरातील वनोद्यान -१ साठी शिवराज पार्क येथील न. प च्या कंपाऊंड बंद खुल्या जागेत आजच्या दिवशी ०६ झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले.

याठिकाणी १०० प्राणवायूयुक्त झाडे लावण्याचा मानस असून पहिले वृक्ष ठाकरे कुटुंबियांच्या वतीने व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने स्व. अनिल ठाकरे यांच्या स्मरणार्थ आकोसिया हे वृक्ष लावून शुभारंभ केला.

यावेळी श्री. नामदेवराव ठाकरे (वडील) आणि सौ चंद्रकला ठाकरे (आई) यांच्या शुभहस्ते हा उपक्रम संपन्न झाला..

यावेळी मिशन ग्रीन पुसद ची संपूर्ण टीम, स्थानिक शिवराज पार्क, श्रद्धा नगर, बंजारा कॉलनी, उमाबाई नगर आणि समता नगर मधील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तसेच शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लावून उत्साह वाढविला.

यावेळी मा. नगरसेविका सौ. डॉ. रुपाली पंकज जयस्वाल, हनुमान संस्थान चे अध्यक्ष मा. मधुकरराव घड्याळे, मा.अमरभाऊ आसेगावकर या मान्यवरांसह स्थानिक नागरिक माझ्यासह सर्वश्री गावंडे सर, डॉ.सारडा साहेब, कार्लावार भाऊ, प्रा.विष्णु गवळी, डॉ. प्रा. स्वाती दळवी (वाठ), दादाराव शिरगिरे, सुभाष कदम सर, दीपक महल्ले सर, चेके सर, श्री भोयर सर, सारंगे सर, विष्णु वांझाळ, एस पी देशमुख सर, मुडपे सर, हिरवे सर, हेमंत मेश्राम, तिवारी सर, कोडापे सर, नितीन पांडे, मधुकर चव्हाण, सौ.गवळी ताई, सौ. कदम ताई, सौ. शिरगीरे ताई यांच्यासह कॉलनीतील चिमुकल्या लेकरांसह मिशन ग्रीन पुसद चे सर्वश्री कौस्तुभ धुमाळे, पवन बोजेवार, प्रा. राहुल पडगीलवार, रितेश फुलेवार, प्रा.शिंदे सर, प्रशांत गावंडे, अमोल गंगात्रे सर, सतीश हरणे, परीस आसेगवकर, नितीन चव्हाण, रुपेश येरावार, यांच्यासह अन्य पर्यावरण प्रेमीनी अथक परिश्रम घेतले..

आज अनुक्रमे.

१) स्व.अनिल ठाकरे यांच्या स्मरणार्थ - ठाकरे परिवार.

२) स्व.नारायणराव गवळी स्मरणार्थ- गवळी परिवार.

३) स्व. विठ्ठलराव कदम स्मरणार्थ- कदम परिवार.

४) स्व. धोंडेराव भोयर स्मरणार्थ- भोयर परिवार.

५) स्व. देवराव शिरगिरे स्मरणार्थ- शिरगीरे परिवार.

६) स्व. संभाजीराव महल्ले स्मरणार्थ- महल्ले परिवार.

वरील ६ वृक्षांचे रोपण केले असून उर्वरीत सर्व वृक्षारोपण दि.०१ जुलै २०२२ रोजी हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक यांच्या जयंती दिनी संपन्न होणार आहे.. शहरवाशियांचा असाच भव्य प्रतिसाद मिळाला तर नक्कीच संपूर्ण शहर ग्रीन सिटी म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर उमटल्याशिवाय राहणार नाही अशी बोलकी प्रतिक्रिया उपस्थितानी दिली

या पर्यावरण पूरक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्वाती दळवी यांनी तर आभार सुनिल ठाकरे यांनी मानले.

#MISSION_GREEN_PUSAD

संबधित बातम्या