महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

माळेगाव स. कारखाना रस्त्यावरती अपघात; धनवान अडागळे यांच्या सतर्कते मुळे ट्रॅक्टर चालकाचे वाचले प्राण.

आज पहाटे 6.24ला घडली घटना; घटनेचा कॅमेरात कैद झालेला व्हिडियो होतोय व्हायरल. धनवान अडागळे यांनी दिली माहिती.
माळेगाव स. कारखाना रस्त्यावरती अपघात; धनवान अडागळे यांच्या सतर्कते मुळे  ट्रॅक्टर चालकाचे वाचले प्राण.
2 y 6 m 1 d 1 hrs 54 min 45 sec ago Baramati, Maharashtra, India

माळेगाव, बारामती : आज पहाटे माळेगाव स. साखर कारखाना रस्त्यावरती उसाच्या ट्रॅक्टरवरचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने विद्युत खांबाला जाऊन धडकला.

याबाबत माहिती अशी की, आज पहाटे धनवान अडागळे घरी पाणी भरत असताना मोठा आवाज झाला त्या आवाजाने त्यांचं लक्ष तिकडे गेले असता त्यांना ट्रॅक्टर खांबाला धडकलेला दिसला ते पाहून तिकडे गेले असता त्यांना चालक दिसून आला नाही. दुसऱ्या बाजूने गेले असता चालक बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. ते पाहून त्यांनी कारखान्याच्या रुग्णवाहिकेला फोन केला.

चालकाला बारामती येथील खाजगी रुग्णालयात तपासणी साठी नेले असता चालक अन्नातून विषबाधा झाल्याने चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याचे लक्षात आले. त्यांना वेळेत उपचार झाल्याने पुढील अनर्थ टळला. धनवान अडागळे यांच्या या सतर्कतेचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

https://youtu.be/gveU-41euso

संबधित बातम्या