श्री. संत सावता महाराज ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.
बारामती : माळेगांव तालुका बारामती येथील श्री संत सावता महाराज ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेची विसावी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
संस्थेचे चेअरमन श्री संपतराव बनसुडे सर अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष श्री नितीन दादा शेंडे, सहकारी शिक्षण संस्थेचे अधिकारी नेवसे साहेब, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष श्री दादा राम झगडे, माजी सभापती श्री.संजय राव भोसले, शिवम पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक राव सस्ते, विलासराव लोणकर, पांडुरंग रासकर, अप्पासाहेब लोणकर होते.
प्रारंभी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. या वेळी ठेवीदारांना ७ टक्के फायदा वाटप करण्यात आले. सचिव विनोद बनकर यांनी आभार मानले.