सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रश्न विरोधी पक्षनेते अजित दादा पवार साहेब यांचे पर्यंत पोहोचवणार - नितीन शेंडे.
बारामती : महाराष्ट्र पोलीस यांची सामाजिक बांधिलकी फार मोलाची असून ते अहोरात्र सेवा बजावत असतात. पण सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना ज्या समस्या भेडसावत आहेत. त्या राज्याचे कार्यक्षम विरोधी पक्षनेते अजित दादा पवार साहेब यांच्या पर्यंत पोहोचवणार आहे. असे प्रतिपादन नितीन शेंडे यांनी केले.
बारामती येथील चिराग गार्डन येथे महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलिस बांधव कल्याणकारी संघटनेच्या सभेत बोलताना केले.
अध्यक्षस्थानी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री संपतराव जाधव साहेब होते. या वेळी जिल्हाध्यक्ष संतोष गजभिये साहेब तसेच महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री महादेव राव पवार, मुंबई अध्यक्ष खांडेकर साहेब, निकम मॅडम, रवि कामठे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सहसचिव शरद पवार यांनी केले.
या वेळी अनेकांनी आपल्या समस्या मांडल्या यावेळी संपतराव जाधव, महादेव पवार यांनी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बारामती अध्यक्ष राष्ट्रपती पारितोषिक विजेते आण्णा जाधव, कार्याध्यक्ष लालासाहेब गावडे पाटील, राजेंद्रजी शेडगे, सुनिलराव बांदल बाळासाहेब जाधव, बनकर आण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमास संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.