महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

बारामती नगरपरिषद बारामती मार्फत स्वच्छ बारामती सुंदर हरित बारामती या विषयावर आधारित भव्य चित्रकला स्पर्धेच आयोजन

बारामती नगरपरिषद बारामती मार्फत स्वच्छ बारामती सुंदर हरित बारामती या विषयावर आधारित भव्य चित्रकला स्पर्धेच आयोजन
1 y 8 m 5 hrs 27 min 43 sec ago Baramati, Maharashtra, India

बारामती दि 13 : नगरपरिषद बारामती मार्फत दि. 11 फेब्रुवारी 2023 रोजी गुल पुनावाला गार्डन मध्ये स्वच्छ बारामती सुंदर हरित बारामती या विषयावर आधारित भव्य चित्रकला स्पर्धा 2023 घेण्यात आली.

सदरहू स्पर्धा 5 वी ते 7 वी गट व 8 वी ते 10 वी गट यामध्ये घेण्यात आली.

या स्पर्धेत बारामती शहरातील नगरपालिका शाळा क्र.1 ते 8, कवी मोरोपंत शिक्षण संस्था बारामती, श्री. छत्रपती शाहू हायस्कूल बारामती, धों. आ. कारभारी सातव हायस्कूल बारामती, झेनेबिया इंग्लिश मिडीयम स्कूल, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी कै.ग.भिवराव देशपांडे हायस्कूल बारामती, मिशन हायस्कूल बारामती, KACF इंग्लिश मिडीयम स्कूल, RN अगरवाल टेक्निकल हायस्कूल, अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कूल,उर्दू हाय स्कूल बारामती या शाळेतील एकूण 925 विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला, स्वच्छ बारामती सुंदर हरित, बारामती या विषयावर आधारित सदर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदविला.

बारामती नगरपरिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश पंच तत्व, घनकचरा व्यवस्थापन करणे, ओला कचरा. सुका कचरा वर्गीकरण करणे, अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापर करणे, सौर ऊर्जा साधने, इलेक्ट्रिक वाहन वापरणे, प्लास्टिक बंदी, कापडी पिशवी वापरणे, वृक्षारोपण करणे विषयी नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी व सोशल लॅब टीम मार्फत जनजागृती करण्यात आली. सर्व शाळेतून 5 वी ते 7 वी गट व 8 वी ते 10 वी गटातून प्रथम 3 विजेते निवडण्यात आले.

विजेत्यांना नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. महेश रोकडे व कला शिक्षक भारत काळे सर व महेंद्र दीक्षित सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सेंद्रिय खत बॅग देण्यात आली. तसेच यावेळी सर्व शाळांमधील सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी शाळेतील विद्यार्थी यांना पर्यावरणाचे स्वच्छतेचे धडे देणाऱ्या एकूण 52 शिक्षकांना पर्यावरण दूत (हरितमित्र) म्हणून प्रमाणपत्र व ओल्या कचऱ्यापासून केलेले सेंद्रिय खत देऊन सन्मानित करण्यात आले.

'स्वच्छ भारत अभियान' आणि 'माझी वसुंधरा अभियान' या दोन्ही अभियानामध्ये सर्व शाळांमधील शिक्षक सर्व विद्यार्थी व बारामतीकरांनी उघड्यावर कचरा न टाकून कचरा घंटागाडीमध्ये ओला व सुका वेगवेगळा देण्याची सवय लावून घेण्यासाठी आवाहन करण्यात आले तसेच सर्व बारामती करानी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याबाबत माननीय मुख्याधिकारी यांनी आवाहन केले.

हि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नगरपालिका सर्व विभाग प्रमुख ऑफिस कर्मचारी अतिक्रमण कर्मचारी उद्यान विभाग वीज विभाग महिला बालकल्याण सुरक्षा रक्षक शिक्षण मंडळ शिक्षक यांनी प्रयत्न केले.

संबधित बातम्या