मळद गावाच्या विकासासाठी अजित दादा पवार विकास निधी कमी पडू देणार नाहीत - श्री. नितीन दादा शेंडे

मळद, बारामती : विकासाची दूरदृष्टी असणारे राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार साहेब बारामती तालुक्यातील गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाहीत. त्यांच्याकडे सत्ता असो किंवा नसो विकासाचा वेग कायम वाढता राहिला आहे असे उद्गार पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष श्री. नितीन दादा शेंडे यांनी मळद गावातील गोकुळ नगर येथील विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी बोलताना काढले.
बारामती नगर परिषदेचे कार्यक्षम नगरसेवक श्री सुरज शेठ सातव यांच्या शुभहस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी मळद गावचे सरपंच श्री योगेश बनसोडे, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष श्री रामचंद्र नाना मदने, श्री. लालासाहेब गावडे पाटील, तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ सुनीता ताई सातव, सौ आशाताई मोहिते, श्रीमती पवार ताई, श्री. दगडू लोंढे, श्री. दिलीप काका, सुभेदार श्री. भारत पवार, श्री. दिलीपराव ढवाणपाटील, श्री. पोपटराव ढवाण पाटील, श्री. त्र्यंबकजी सातव, श्री. नाना गावडेपाटील, श्री. गणेश सातव, श्री. भाऊसाहेब पडळकर, श्री. अशोक पवार, श्री. अमोल पवार, श्री. नाना जाधव, श्री. कल्याण मोहिते तसेच स्थानिक ढगे परिवार, माने परिवार, गवारे परिवार, चव्हाण परिवार, यादव परिवार, वायदंडे परिवार, काळे परिवार, झगडे परिवार, या परिसरातील प्रत्येक परिवारातील प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे माहिती देताना शेंडे म्हणाले की आपल्या गावावर अजित दादांचे विशेष लक्ष असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून गावाला साडेसहा कोटी रुपयांचा विकास निधी दिलेला आहे.. त्यांच्या या विश्वासाला पात्र राहूनच विकास कामे करावीत.
याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि गावात सुरू असलेल्या विकास कामांबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.