"तरुणांनी राजकारणात कशासाठी यावे ....?"
दर पंचवार्षिक निवडणुकी प्रमाणे ,लवकरच २०२४ च्या निवडणुकीचे बिगुड वाजणार आहे .
नेते मंडळीना ह्याचा शुभा-शुभ नसतो त्यांना माहित आहे कि, मतदान हे पैशाचाच जीवावर चालते म्ह्नुणुन हे लोक मतदान आले कि पैशाच्या ढिगार्यावर बसून दुचकत (मनात थोडी-फार शंका ठेवून) मतदान प्रक्रिया पार पाडतात .
सध्या २०२४ चा काळ, हा डिजिटल काळ आहे , मागील २०१९ चा पण होता पण त्यावेळी सामान्य माणसाच्या हातात क्वचितच डिजिटल (ANDROID)मोबाईल होता . आजचा साम्मान्यातील सामान्य माणूस डिजिटल झाला आहे .त्याला माहित आहे कि , कोण आहे असली आणि कोण
नकली .
मागील पंचवार्षिक ला मी सोशल मिडिया मध्ये एक पोस्ट वाइरल केली होती ,ती संपूर्ण महाराष्ट्रात फेमस झाली होती ..ती पोस्ट ...
मतदानाचा हक्क सर्वांनी बजवा !
पण प्रचारातील आश्वासनांना बळी पडून "सैराट" होऊ नका ,
कोणत्याही पार्टीचा विचार करताना " सध्या ती काय करते " हे पाहण्यापेक्षा तिने माझ्यासाठी काय केले ,
अथवा ती माझ्यासाठी काय करू शकते याचा विचार करा आणि मगच आपले बहुमूल्य मत द्या .
"रईस "नेता निवडून देण्यापेक्षा "काबील" नेता शोधा असा उमेदवार शोधा कि ज्याला पाहताच क्षणी तुमच मन तुम्हाला सांगेल "बगतोस काय मुजरा कर !" त्यालाच तुमच बहुमूल्य मत द्या , नाहीतर" ध्यानी मनी "नसलेला उमेदवार निवडून येईल आणि मग पुढची पाच वर्ष आशेच्या" व्हेंटीलेटर "वरचं काढावी लागतील एवढंमात्र नक्की .
हा मजकूर ....मागील पंचवार्षिक निवडणुकीतले आहे , कित्येक लोक अजूनही आशेच्या
"व्हेंटीलेटर" आहेत हे सांगण्याची आपणास गरज नाही.
त्यासाठी ...
तरुणांनी २०२४ ला राजकारणात येण्याची गरज आहे .
त्यासाठी आतापासूनच तयारीला लागणे गरजेचे आहे.
तरुणांनो... राजकारण किंवा राजनीती म्हणजे काय? तर याच उत्तर काल राज्यशस्त्राच्या पुस्तकामध्ये मला मिळालं ते अस "जे चांगल्या नितीमुल्यांच्या आधारे आणि पारदर्शक पद्धतीने चालवले जाणारे शासन म्हणजे राजकारण होय" पण आपल्या भारत देशात त्याची वेगळीच व्याख्या तयार झाली आहे किंवा काहींनी ती जाणून बुजून तयार केली ती आशी
"जे शुन्य नितीमुल्याच्या आधारे आणि पैशाच्या जीवावर चालवले जाणारे शासन म्हणजे राजकारण किंवा राजनीती होय".
आपला भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. ज्या देशाकडे महासत्ता होण्याची ताकत आहे त्या देश्यामध्ये चालणारे शासन एवढे नितीशुन्य का ? ? एवढे भ्रष्ट का ? ? ज्या क्षेत्रांमध्ये म्हणजे राजकारणामध्ये आपला देश महासत्ता बनवण्याची, सामान्य माणसाचे नसीब घडवण्याची धमक आहे आस क्षेत्र एवढे उदासीन का ? एवढे भ्रष्ट का ? ? याला फक्त आणि फक्त एकच कारण आहे ते म्हणजे त्या क्षेत्रात सामील असणारी आगदी आल्प तरुण पिढी.
स्वामी विवेकांदानी म्हटल्याप्रमाणे "ज्या पिढी मध्ये जग जिंकण्याची धमक असते आशी तरुण पिढी".
पण या पिढीला राजकारणापासून दूर राहण्याची अनेक कारण आहेत. त्यापैकी घराणेशाही, जेष्ठांची मक्तेदारी, भ्रष्टाचार आणि असुरक्षितता आणि आणखी काही काही .... आणि जे तरुण येताहेत ते प्रामुख्याने घराणेशाही किंवा पैश्याच्या जीवावर आणि ते निवडून येतात कारण आपणच त्यांना निवडून देतो कारण आपल्यापुढे पर्याय नसतो निवडून देण्याशिवाय कोणी जरी निवडून आले तरी आपल्याला सामान्य माणसाला त्याचा काही फरक पडणार नसतो. आणखी एक महत्वाच कारण म्हणजे आज आपल्या सगळ्या तरुणांची एक भावना तयार झाली आहे ती म्हणजे..
"मी बरा आणि माझ काम बर" फक्त स्वतः पुरत बघन. देशाची कोणाला पडलीच नाही. चाललय तस चालू द्या. हि आपली भावना सुद्धा राजकारणी लोकांनी ओळखली आहे. त्यामुळेच आपण सर्व जन राजकारणापासून दूर आहोत.
तरुणांनो आपली बाईक खड्यात गेली कि राजकारणी लोकांच्या नावाने ओरडतो. आपलेच तरुण ज्यावेळेस सुशिक्षित बेरोजगार हे लेबल लावून फिरतात तेव्हा हि आपण राज्यकर्त्यानाच दोष देऊन मोकळे होतो. पण ज्या वेळेस विदर्भात शेतकरी आत्महत्या करतो त्यावेळेस मग वाटत खरच आपल्या सामान्य माणसाला निवडून दिल असत तर... पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. आपण फक्त सिस्टिमला दोष देऊन गप्प बसतो.
तरुणांनो आपण सिस्टिमला दोष न देता सिस्टीम मधील 'व्हायरस' बाहेर काढला पाहिजे. तर आणि तरच आपण आपल्याला हवा तो बदल घडून आणू शकतो. त्यासाठी आपण सर्व तरुणांनी राजकारणाकडे देश बदलवणारे क्षेत्र म्हणून पाहिलं पाहिजे.
रोजच्या दगदगीच्या जीवनातून वेळ काढुन "मी आणि माझा" च्या भूमिकेच्या पलीकडे जाऊन इतरांसाठी आपल्या समाजासाठी, देशासाठी काहीतरी करायला हव. एक सुरवात कोठेतरी करायला हवी तरच कदाचित कोठेतरी उद्याच्या बदलाची रम्य पहाट उगवेल आणि एक मोठ्या बदलाची सुरवात होईल. युवकांनो "बदल हा प्रत्येकाला हवा आसतो पण त्याला गरज असते एका चांगल्या नेतृत्वाची" हे नेतृत्व आपल्या तरुण पिढीतून पुढे यायला हव आणि यासाठीच तुम्ही - आम्ही तरुण पिढीने राजकारणात यायला हवं.. ज्यांना महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखतात असे माझी मुख्यमंत्री स्व .यशवंतराव चव्हाण साहेब यांनी हि तरुण वयामध्ये राजकारणात उडी घेतली होती.
लेखक सर सेठ गोडीन यांनी म्हटलंच आहे "लवकर केलेला बदल हा धोकादायक ठरतोच असे नाही पण ज्यावेळेस बदल व्यायला खूप उशिरा सुरवात होते त्याच वेळेस तो धोकादायक ठरतो" तरुणांनो आत्ता एका नव्या युगाची आणि नव्या भारताची मुहूर्तमेढ रोवायची वेळ आली आहे आणि त्यासाठी आपल्यासारख्या तरुण पिढीची गरज आपल्या देशाला आहे. त्यासाठी लेखक सर सेठ गोडीन यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्याला बदलाची सुरवात लवकर करायची आहे त्याच साठी तरुण पिढीने राजकारणात सक्रिय झाल पाहिजे.
कारण ज्यावेळेस तरुण पिढीच्या हातात देशाची, राज्याची, जिल्ह्याची, तालुक्याची, गावाची सत्ता असेल त्याच वेळेस आपण आपल्या देशात हवा तो बदल घडून आणू शकतो. आपला देश "२०२० महासत्ता" होण्याच डॉक्टर कलाम याचं स्वप्न साकार करू शकतो. याच साठी तरुण पिढीने राजकारणात यायला हवं.........
तेव्हा मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा...
सतीश(भाऊ)साबळे .
अध्यक्ष:-महाराष्ट्र सोशल मिडिया (महाराष्ट्र राज्य).