महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

अवकाळी पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास नुकसान भरपाई तात्काळ देणार - पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

अवकाळी पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास नुकसान भरपाई तात्काळ देणार - पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
December 04, 2021 10:12 AM ago Baramati, Maharashtra, India

बारामती : राज्यात अवकाळी पावसामुळे पशुधनाची फार मोठे नुकसान झाले आहे राज्यामध्ये 1डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे लहान मोठी जनावरे मृत्युमुखी पडले आहेत.

बारामती तालुक्यातील सुपा कुतवळवाडी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

ठीक ठिकाणी राज्यभरात याचा फटका बसला असून पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे 2000 जनावरांची मृत्यू झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये 200, जनावरे नाशिक जिल्ह्यामध्ये 515, जनावरे अहमदनगर जिल्ह्यामध्ये 713 जनावरे, आणि रायगड येथे 2 जनावरे मृत्यूमुखी पडल्याची माहिती देण्यात आले. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात 750, आंबेगाव तालुक्यात 403, शिरूर तालुक्यात 381, पुरंदर तालुक्यात 150, मावळ तालुक्यात 110, खेड तालुक्यात 94, बारामती तालुक्यात 88, दौंड तालुक्यात 44 व हवेली तालुक्यात 23 एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनावरांचा मृत्यू चा आकडा असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये पंचनामे सुरू असून कुणाचे राहिले असल्यास त्यांनी पशुसंवर्धन अधिकारी यांचे कडे जाऊन पंचनामे करून घेण्याच्या सूचना राज्यमंत्री भरणे यांनी दिल्या.

तसेच कानाडवाडी येथील लांडग्यांच्या हल्ल्यात 24 शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटनेचा आढावा घेऊन वनविभातील अधिकारी वर्गाला तात्काळ मूल्यांकन करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. अवकाळी पावसामुळे मृत्यूमुखी पडलेल्या शेळी मेंढी करिता 4000 रु, गाई करिता 40000रु, बैल 30000 रु इतकी नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री मुकणे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.

संबधित बातम्या