महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

कोरोना वाढला तरी विकास कामे थांबणार नाहीत; गर्दी टाळण्यासाठी इंदापुरात ऑनलाईन उद्घाटने.

राज्यातील पहिलाच उपक्रम; राज्यमंत्री दत्ता मामा भरणे व खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार ऑनलाईन उद्घाटने.
कोरोना वाढला तरी विकास कामे थांबणार  नाहीत; गर्दी टाळण्यासाठी इंदापुरात ऑनलाईन उद्घाटने.
March 26, 2021 10:19 AM ago Indapur, Maharashtra, India

हा राज्यातील पहिलाच उपक्रम असुन सध्य स्थितीत गर्दी टाळण्यासाठी अश्या प्रकारे सर्वच ठिकाणी कार्यक्रम होणे गरजेचे आहे.

इंदापूर: राज्यात कोरोना पेशंटची वाढती संख्या चिंताजनक असून राज्यात ठिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लावले जात आहे. अश्या परिस्थितीत ही सरकारी योजना राबविणे व विकास कामे होणे गरजेचे आहे. अशा वेळी कार्यक्रमांना गर्दी होत असते यावर उपाय म्हणून इंदापूर तालुक्यातील आठ ठिकाणी 128 कोटी रुपयांच्या विकास कामाची उद्घाटने व भूमिपूजन ही ऑनलाईन पध्दतीने होणार आहे आणि विशेष म्हणजे हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे.

इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार व राज्यमंत्री दत्ता मामा भरणे नेहमीच विविध योजनांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यासाठी भरघोस निधी आणतात. इंदापूर तालुक्यात विविध चाळीस रस्ते, पूल व जिल्हा नियोजन समिती, आमदार फंड, खासदार फंड, दलित वस्ती सुधारणा योजना यासाठी 128 कोटी मंजूर झालेले आहेत. तसेच नुकत्याच मंजूर केलेल्या तालुक्यातील विविध रस्ते पुलाची कामे यातून पूर्ण केले जाणार असून काही इमारतींची बांधकामे देखील यामध्ये समाविष्ट आहेत. या कामांची भूमिपूजने व काही ठिकाणची उद्घाटने येत्या शनिवारी सकाळी दहा वाजता एकाच वेळी ऑनलाईन होणार आहेत.

यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते प्रत्येक जिल्हा परिषद गटांमध्ये ऑनलाईन पद्धतीने सकाळी दहा वाजता ही भूमिपूजन व उद्घाटन होणार आहेत.

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी, शिरसोडी, वडापुरी, सराटी, मदनवाडी, सपकळवाडी, कळंब व इंदापुरातील प्रशासकीय भवन अशा ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सोनाई उद्योगसमूहाचे अध्यक्ष दशरथ माने, तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, गावाचे सरपंच, उपसरपंच आदींच्या उपस्थितीत हा ऑनलाईन कार्यक्रम होणार आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, महिला अध्यक्षा छाया पडसळकर, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, सोशल मीडिया अध्यक्ष हामा पाटील, महिला शहराध्यक्षा उमा इंगोले, युवक कार्याध्यक्ष सचिन खामगळ, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप व्यवहारे आदीही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

संबधित बातम्या