बारामती राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल महिलाध्यक्षपदी सौ द्वारकाताई कारंडे यांची निवड
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे कार्याध्यक्ष श्री. नितीन दादा शेंडे यांनी दिले पत्र.
बारामती दि.8 : बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे अध्यक्ष पदी शिवाजीनगर, जळोची येथील कार्यकर्त्या सौ.द्वारकाताई कैलास कारंडे यांची निवड पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे कार्याध्यक्ष श्री. नितीन दादा शेंडे यांनी केली आहे.
आज रोजी याचे नियुक्तीपत्र बारामती राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथील बैठकीत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री.संभाजी नाना होळकर, शहराध्यक्ष श्री.जय पाटील, युवती अध्यक्ष सौ.आरतीताई शेंडगे, वनिता ताई बनकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष साधू बल्लाळ, शहर अध्यक्ष गणेश भाई सोनवने, युवा अध्यक्ष अविनाश बांदल, शब्बीर शेख, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे अध्यक्ष दादा राम झगडे, शहर अध्यक्ष स्वप्नील भागवत, संपतराव बनसुडे, रियाज शेख, दादा सो विधाते, तन्वीर इनामदार आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
या वेळी कार्यकर्ते व महिला भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.