महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने बारामती मध्ये जल्लोष

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल पुणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. नितीन दादा शेंडे यांनी मानले मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आभार.
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने बारामती मध्ये जल्लोष
July 21, 2022 12:20 PM ago Baramati, Maharashtra, India

बारामती: सर्वोच्च न्यायालयाने आज दुपारी ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के राजकीय आरक्षणाला मान्यता दिल्यानंतर गेली अडीच वर्ष अस्वस्थ झालेल्या ओबीसी समाजाला न्याय दिल्याबद्दल या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी आणि आपला आनंद व्यक्त करण्यासाठी बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने जल्लोष करण्यात आला. फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरून मिठाई भरून समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल कार्याध्यक्ष श्री नितीन दादा शेंडे पुणे जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष श्री अनिल लडकत, काँग्रेसचे महाराष्ट्र ओबीसी सेल उपाध्यक्ष श्री रोहित बनकर, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष श्री दादा राम झगडे, शहराध्यक्ष स्वप्निल भागवत, महिला तालुकाध्यक्ष सौ.वनिताताई बनकर, सौ.सीमाताई पांढरे माळेगाव कारखान्याचे संचालक सागर भोंगळे, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री. दादा थोरात, बाळासाहेब चव्हाण पाटील, श्री. निलेश टिळेकर, बारामती समता परिषद अध्यक्ष श्री. सोनु लोणकर, सागर देवकाते पाटील, श्री. तनवीर इनामदार, श्री. रियाज शेख, श्री. हरून बाबा शेख, श्री.नितीन थोरात, गणेश पवार, सामाजिक कार्यकर्ते श्री. मोहन शेठ भटियानी, माऊली काळे, श्री. लालासाहेब गावडे, श्री. विशाल गायकवाड, श्री. नानासो गावडे, श्री. बाळासाहेब जराड आधी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

संबधित बातम्या