महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

जातीनिहाय जनगणना करावी; राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल ची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष नितीन दादा शेंडे व सहकाऱ्यांनी दिले निवेदन
जातीनिहाय जनगणना करावी; राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल ची मागणी
1 y 11 m 8 hrs 27 min 56 sec ago Baramati, Maharashtra, India

बारामती : तामिळनाडू, छत्तीसगड सह काही राज्यांत जातिनिहाय जनगणना झाली असून सध्या बिहार राज्यांमधे तिथल्या राज्य सरकार ने स्वतंत्र जातिनिहाय जनगणना सुरू केली आहे.तशी महाराष्ट्र सरकारने ही करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे वतीने बारामती येथील सरकारचे प्रतिनिधी तहसीलदार विजय पाटील साहेब यांना लेखी निवेदन देऊन केली आहे.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे कार्याध्यक्ष श्री नितीन दादा शेंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे अध्यक्ष दादा राम झगडे, शहर अध्यक्ष स्वप्नील भागवत, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नाताई लोणकर, स्मिताताई पांढरे, प्रतीक सुपेकर, नितीन थोरात, तन्वीर इनामदार, पोपटशेठ खडके, तुषार हिरवे, गणेश पवार, रियाज शेख, प्रमोद बोराटे, दादासो विधाते, शरदराव होले संपतराव बनसोडे ज्योतीराम झगडे ई. कार्यकर्त्यांनी तहसीलदार विजय पाटील साहेब यांना भेटून निवेदन दिले.

या निवेदनात पुढे नमुद केले कि १९९४ साली केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे हे सरकारला पटऊन दिले आहे. याची नोंद घेऊन महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर जातिनिहाय जनगणना करावी.

निवेदन दिल्यानंतर तहसीलदार विजय पाटील साहेब म्हणाले तुमच्या भावना आणि मागणी लवकरच सरकार दरबारी पोहोचवल्या जातील.

संबधित बातम्या