महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

मळद गावच्या सरपंचाचा प्रामाणिकपणा

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल कार्याध्यक्ष नितीन दादा शेंडे यांनी केले कौतुक.
मळद गावच्या सरपंचाचा प्रामाणिकपणा
April 13, 2022 09:18 AM ago Baramati, Maharashtra, India

बारामती दि.12 : मळद गावचे विद्यमान सरपंच श्री योगेश बनसोडे यांना आज रोजी सापडलेला रुपये अकरा हजार चा धनादेश. त्यांनी ज्याच्या होता त्याला सुपूर्द केला.

गोविंद बाग शारदानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते जमले होते तेथून परत येत असताना शारदा नगर परिसरात श्री योगेश बनसोडे यांना श्री दिनेश दिलीप जगताप यांच्या नावावरील अकरा हजार रुपयांचा धनादेश सापडला. त्यांनी ही बाब श्री नितीन दादा शेंडे यांचे कानावर घातली त्यांनी ताबडतोब लगेच फोनाफोनी करून शोध घेतला असता अमराइ भागातील नगरसेवक असणाऱ्या बबलू जगताप यांचा तो चेक होता आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी त्यांना हा चेक एका संस्थेकडून देण्यात आलेला होता. ताबडतोब त्या नगरसेवकांचे कार्यकर्ते श्री वाघमोडे यांचेकडे तो चेक सुपूर्द केला.

याप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल कार्याध्यक्ष श्री नितीन दादा शेंडे, माजी सरपंच, श्री धनंजय भाऊ गवारे, श्री दादाराम झगडे, श्री राजकुमार पोतेकर बापू, माजी उपसरपंच श्री युवराज नाना शेंडे यांच्या उपस्थितत योगेश बनसोडे यांनी हा चेक श्री वाघमोडे यांना सुपूर्द केला.

याप्रसंगी बबलू जगताप यांनी सरपंचाचे आभार मानले.

संबधित बातम्या