महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

नाशिक जिल्हा स्वाभिमानी युवा सेनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी मा. श्री. गणेश कैलासराव गौड

नाशिक जिल्हा स्वाभिमानी युवा सेनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी मा. श्री. गणेश कैलासराव गौड
December 27, 2022 07:23 PM ago Nashik, Maharashtra, India

नाशिक : महाराष्ट्र राज्यस्तरीय राष्ट्रीय एकात्मता भाई चारा जातीय सलोखा जोडो, भव्य सदस्य नोंदणी अभियान, तसेच, वार्ड येथे शाखा व घर तेथे कार्यकर्ता!! हा भव्य संकल्प महा अभियान सर्वात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यासाठी, सर्वसामान्य माणसाचा बुलंद आवाज म्हणून स्वाभिमानी सेनेच्या, सर्व महत्वपूर्ण कोअर कमिटीची बैठक महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष आदर्श युवा समाज भूषण कार्यसम्राट, जनसेवक मा.श्री. डॉ.शेरूभाई सादिकभाई मोमीन यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

यावेळी स्वाभिमानी सेनेच्या नाशिक जिल्हा युवा जिल्हा कार्याध्यक्षपदी नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आदर्श युवा समाज भूषण, कार्यसम्राट, मा. श्री. गणेशभाई कैलासराव गौड यांच्या निवडीची आज घोषणा सर्वानुमते करण्यात आली,.

यावेळी स्वाभिमानी युवा सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष, विजय दादा मापारी, संघटक विजय भोसले, दादाभाई तांबोळी, अ. लतीफ शेख, गणपत जाधव, सुलतान पठाण, जाकीरभाई मोमीन, याकूब शेख, धर्मराज अलगट, हैदरभाई सैय्यद, गुलाबराव कमोदकर, सुरेशदादा कटके, अंबादास कटके, गोरख कमोदकर, अनिस सैय्यद, राशीद अन्सारी, वस्ताद अकीलबाबा शेख, सिद्धीक अन्सारी, मोबीन मुलतानी, आदम मोमीन, बिलाल मोमीन, हुसेन हाजी बाबा कुरेशी, आ वेश सौदागर, आरिफ सौदागर, अरबाज कुरेशी, शाहीदभैय्या कुरेशी, संजय संत, हुसेन अन्सारी, राजेंद्र संत, आदी सह सदस्य कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबधित बातम्या