महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

एका महिलेच्या जिद्दीची अशीही कहाणी...! 9 महिन्याच्या गर्भावस्थेतही दिली परीक्षा

एका महिलेच्या जिद्दीची अशीही कहाणी...! 9 महिन्याच्या गर्भावस्थेतही दिली परीक्षा
June 24, 2023 06:09 PM ago Daund, Maharashtra, India

वरवंड : वरवंड, पुणे येथील एका महिलेने 9 महिन्याच्या गर्भावस्थेतही एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालय, वरवंड, ता. दौंड येथे लेखी परिक्षा दिल्याने परिसरात तिच्या जिद्दीचे कौतुक होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालय, वरवंड, ता. दौंड येथे एम.कॉम. च्या द्वितीय वर्षात शिकत असलेली तन्वी मनोज आपुणे ही 9 महिन्यांची गर्भवती होती. त्यातच परिक्षा आल्याने तिने जिद्दीने परिक्षा देण्याचे ठरवले. त्याचवेळी या अवस्थेत तिला रक्तदाबाचा त्रासही होत होता. तरीही तिने आपल्या त्रासाकडे न पाहता तशाही अवस्थेत परिक्षा दिली. या अवस्थेत परिक्षा देवून तिने जगासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

शिक्षण कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबता कामा नये. शिक्षण घेण्यासाठी कोणत्याच गोष्टीची अट नसते. तुमच्यामध्ये शिकण्याची जिद्द असेल तर तुम्ही कोणत्याही संकटावर मात करु शकता, हे तिने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. तिच्या या जिद्दीचे परिसरातून कौतुक होत आहे.

संबधित बातम्या