राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे वतीने रक्तदान करणाऱ्यांचा सत्कार
बारामती : शहरातील दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्यासाठी सोलापूर चे चतुर्भुज पाटील आले असता त्यांना ७/८बाटली रक्त आवश्यक होते ब्लड बँकेत उपलब्ध नव्हते अशावेळी बारामतीत कोणी नातेवाईक किंवा परिचीतनसल्याने ते संकटात सापडलेल्या अवस्थेत असताना त्यांच्या मदतीला आमराई परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष जगताप सर, दादा अहिवळे, शिवा तुपे, बंटी डिकले, सोमनाथ कदम, सिध्दार्थ लांडगे हे देवदूतासारखे धाऊन आले व स्वतः रक्तदान करुन मदत केली व रूग्णाचा जीव वाचवला.
या घटनेची दखल बारामती राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल ने घेत रक्तदान करणाऱ्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे कार्याध्यक्ष श्री नितीन दादा शेंडे, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे अध्यक्ष दादा राम झगडे, बारामती शह़र राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे अध्यक्ष स्वप्नील भागवत, संघटक तन्वीर इनामदार, सामाजिक कार्यकर्ते दिपकराव कुदळे, मोहन भटीयानी, पत्रकार तैनुरभाई शेख, सिरीकांत जाधव, लोहोकरे वकील, हिंगणे आबा आदी मान्यवर उपस्थित होते.
पद्मश्री शरदचंद्रजी पवार साहेब फिटनेस सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत जिमचे संचालक संतोष जगताप सर यांनी केले.