हू. बहिर्जी शिंदे यांचे संगमरवरी शिल्पाचे अनावरण.
विरपुत्र बहिर्जी शिंदे यांच्या जन्मभूमीत त्यांचा सन्मान करण्याचे महतभाग्य लाभल्याने धन्य झालो. त्यांचे विचार आम्हाला सदैव प्रेरणादायी- माजी मंत्री मा.श्री जयप्रकाश दांडेगावकर (अध्यक्ष हू. बहिर्जी स्मारक शिक्षण संस्था, वापटी तथा अध्यक्ष राष्ट्रीय साखर संघ नवी दिल्ली)

वापटी, हिंगोली दि.17: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने वापटी येथील हुतात्मा बहिर्जी हणमंतराव शिंदे यांच्या संगमरवरी शिल्पाचे अनावरण स्थानिक बहिर्जी विद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
थाटामाटात पार पडलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बहिर्जी संस्थेचे उपाध्यक्ष मा श्री अँड मुंजाजीराव जाधव साहेब (माजी आमदार) हे लाभले होते. उद्घाटक म्हणून मा श्री जयप्रकाश दांडेगावकर साहेब हे लाभले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर वसमत विधानसभेचे लाडके युवा आमदार मा श्री राजू भैय्या नवघरे, हू. बहिर्जी संस्थेचे सचिव मा.श्री पंडितराव देशमुख सर(माजी आमदार), संस्थेचे संचालक मा.श्री अँड रामचंद्र बागल साहेब, मा. श्री शंकरराव कऱ्हाळे साहेब (शाळा समिती अध्यक्ष - बहिर्जी विद्यालय गिरगांव), म. ज्यो. फुले उच्च माध्यमिक शाळा समितीचे अध्यक्ष मा.श्री डॉ.वसंतराव पतंगे साहेब, नवोदित संचालक मा.श्री नितीनभैय्या पाटील महागावकर संस्थेचे कोषाध्यक्ष मा. श्री उमाकांतराव शिंदे, संस्थेचे संचालक मा.श्री प्रवीण दादा शेळके सर(मुख्याध्यापक -बहिर्जी विद्यालय गिरगांव), मा संचालक प्रा अनिल नादरे सर, मा.बालासाहेब महागावकर (शाळा समिती सदस्य बहिर्जी विद्यालय वसमत, मा श्री विलासराव भोसकर साहेब (सदस्य -म ज्यो फुले वि.शाळा समिती कळमनुरी) वकील संघाचे अध्यक्ष मा.तेलगोटे साहेब, मा प्रल्हादराव सावंत(संचालक), मा बाळुमामा ढोरे, मा.अँड श्री राम झुंजूर्डे साहेब (संचालक), यांच्यासह वापटीच्या आद्य नागरिक श्रीमती कावेरीबाई भगवानराव शिंदे (सरपंच ग्राम पंचायत वापटी), मा श्री दिलीपराव शिंदे (पोलीस पाटील वापटी) व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रथमतः मान्यवरांनी हू. बहिर्जी शिंदे यांच्या स्मृती स्थळी नतमस्तक होऊन अभिवादन केले.. व नेत्रदीपक आणि सुशोभित अशा संगमरवरी शिल्पाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी एम शिंदे सरांनी करून बहिर्जी यांच्या कार्याची महती सांगितली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाशराव इंगळे सर(उपमुख्याध्यापक बहिर्जी विद्यालय वसमत) यांनी तर आभार श्री. गणपत नरवाडे सर (क्रीडा शिक्षक बहिर्जी विद्यालय वापटी) यांनी केले.
या कार्यक्रमाचे छायांकन श्री अरुण शिंदे यांनी तर वृतांकन श्री सुनिल एन.ठाकरे. पुसद. यांनी केले.
या कार्यक्रमासाठी हू. बहिर्जी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी मा.श्री बाबुराव खिल्लारे सर, कार्यालयीन तज्ञ श्री गुजराथी सर, संस्थेचे सर्व सभासद, मुख्याध्यापक श्री विश्वासराव देशमुख सर (बहिर्जी विद्यालय वसमत), मुख्याध्यापक श्री सुरेश वगेवार सर, (गोरखनाथ विद्यालय चोंडी), पर्यवेक्षक श्री विजयकुमार जटाळे सर(म.ज्यो. फुले विद्यालय, कळमनुरी), यांचेसह संस्थेच्या सर्व शाखेतील कर्मचारी बांधव आणि गावकरी मंडळी व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
स्थानिक शाळा समिती अध्यक्ष श्री. उमाकांतराव शिंदे साहेब व सर्व शाळा समिती सदस्य यांच्या मार्गदर्शनात श्री रविशंकरभाऊ शिंदे (नाना) यांच्या पुढाकारात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी एम शिंदे सर प्राथमिक शाळा चे मुख्याध्यापक श्री डी आर इंगळे सर यांच्या नेतृत्वात सर्व स्टाफ ने श्री मनोज उमाकांतराव शिंदे (कार्याध्यक्ष शिक्षकेतर कर्मचारी संघटना, हिंगोली), अँड अरुण उमाकांतराव शिंदे, सूरज शिंदे व संपूर्ण शिंदे परिवार (वापटीकर) यांनी अथक परिश्रम घेऊन स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.