महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मंजूर शौचालय बांधकामे चालू करावी - शीतलताई साबळे

शीतल ताई साबळे यांच्या नेतृत्वाखाली अंथुर्णे ग्रामपंचायतीवर मोर्चा
स्वच्छ भारत अभियानांतर्गत मंजूर शौचालय बांधकामे चालू करावी - शीतलताई साबळे
December 27, 2022 02:25 PM ago Indapur, Maharashtra, India

अंथुर्णे : येथील उखळ माळ (महात्मा फुले नगर) येथे शेती महामंडळ कामगार राहत असून त्यांना स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालये मंजूर झाली असूनही त्या बद्दलची कोणतीही कार्यवाही ग्रामपंचायती कडून होताना दिसत नाही त्यामुळे येथील रहिवासीयांवर अन्याय होताना दिसत आहे याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भाजपा पुणे जिल्हा कार्यकारणी सदस्या शितल ताई साबळे यांच्या नेतृत्वाखाली अंथुर्णे ग्रामपंचायततीवर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी अंथुर्णे ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदने देण्यात आली. यावेळी भाजपा पुणे जिल्हा कार्यकारणी सदस्या शितल ताई साबळे, सामाजिक कार्यकर्ते अतुल बनसोडे, स्वप्नील धीमधीमे, संजय वनचाळे, लक्ष्मीताई वनचाळे, कमलताई गवळी, कमलताई ओव्हाळ आदी उपस्थित होते

संबधित बातम्या