पुणे जिल्हा महिला मोर्चा भाजपा चिटणीस शीतल ताई साबळे यांच्या माध्यमातुन काटी, तालुका इंदापूर येथे गाव चलो अभियान व हंळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन.
इंदापुर दि.17 : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्षा महिला मोर्चा मा. चित्राताई वाघ, भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष श्री. वासुदेव नाना काळे व भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा मा. स्नेहल ताई दगडे यांच्या सूचनेनुसार व शीतल ताई साबळे, पुणे जिल्हा महिला मोर्चा भाजपा चिटणीस यांच्या नेतृत्वाखाली काटी, तालुका इंदापूर येथे गाव चलो अभियान व हंळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी सीआरपी शोभाताई वाघमोडे यांचा सत्कार करून बाकी त्यांच्या सोबत नेतृत्व करणाऱ्या महिलांचा देखील सत्कार करण्यात आला.
यादरम्यान प्रधानमंत्री मोदीजी यांच्या केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना याबद्दल माहिती सांगून महिलांच्या प्रश्नांना उत्तरे दिली तसेच त्यांना भारतीय जनता पक्ष सदैव तुमच्या सोबत असल्याची खात्री करून दिली.
यावेळी काटी व आसपास परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.