बँक ऑफ बडोदाचा ११५ वा स्थापनादिवस २० जुलै २०२२ रोजी बारामतीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा.
बारामती : बँक ऑफ बडोदा तर्फे कऱ्हावागज येथील निवासी मूकबधिर शाळेमधील विद्यार्थ्यांना क्रिडा गणवेशांचे वितरण करण्यात आले. यावेळी बँक ऑफ बडोदाचे मुख्य प्रबंधक श्री. किरण जाधव यांनी बँकेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत बँकेने सामाजिक बांधीलकीप्रती केलेल्या विविध कार्यांची माहीती दिली. तसेच श्री यशोदीप कला, क्रिडा व शिक्षण प्रसारक मंडळाचे त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कौतुकही केले.
यावेळी बँक ऑफ बडोदाचे बारामतीमधील सर्व अधिकारी उपस्थित होते. बँक ऑफ बडोदाच्या सेवासुविधा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवण्याचा मानस असल्याचे यावेळी मुख्य प्रबंधक श्री. किरण जाधव यांनी सांगीतले.
आलेल्या मान्यवारांचे स्वागत संस्थेच्या अध्यक्ष सौ.रामेश्वरी जाधव यांनी केले व आभार अश्विनी भोसले यांनी मानले.