महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

अविरत रूग्णसेवेची ३४ वर्ष पुर्ण... गिरीराज हाॅस्पिटल, बारामती चा 34 वा वर्धापन दिन साजरा.

अविरत रूग्णसेवेची ३४ वर्ष पुर्ण... गिरीराज हाॅस्पिटल, बारामती चा 34 वा वर्धापन दिन साजरा.
March 07, 2021 06:00 AM ago Baramati, Maharashtra, India

बारामती : दि.६ मार्च २०२१ रोजी गिरीराज हॅास्पिटल, बारामती यांचा ३४ वा वर्धापण दिन साजरा करण्यात आला यावेळी गिरीराज हॅास्पिटलचे सर्वेसर्वा डॅा रमेश भोइटे व त्यांची पत्नी निर्मला भोइटे यांनी केक कापून सर्व कर्मचाऱ्यांसोबत हा सोहळा साजरा केला.

६ मार्च १९८७ रोजी गिरीराज हॅास्पिटलचा उद्याटन सोहळा मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला होता, तेव्हापासून डॅा रमेश भोइटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वत:ला रूग्ण सेवेसाठी झोकून दिले आहे.

डॅा. रमेश भोइटे व त्यांच्या सहकाऱ्यांचा ग्रामीण भागातील रूग्णांना नेहमी कमी खर्चात अत्याधुनिक सेवा प्रधान करण्याचा प्रयत्न असतो. तसेच हाॅस्पिटलला NABH नामांकन मिळाले आहे. यामुळे गिरीराज हॅास्पिटल अनेक रूग्णांसाठी जीवन संजिवनी ठरत आहे. त्यांच्या या कार्याला सलाम.

संबधित बातम्या