महाराष्ट्र सोशल मिडीया च्या पुणे महिला जिल्हाध्यक्षपदी शितलताई विशाल सोनवणे (साबळे) यांची निवड.
महिलांच्या प्रश्नांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून फोडणार वाचा.

इंदापुर : महाराष्ट्र सोशल मिडीयाने नेहमीच सामान्य जनता व महिलांच्या प्रश्नांना सोशल मिडीयाच्या माध्यमातुन पाठपुरावा केला. आता येथून पुढे महिलांच्या प्रश्नांना अधिक गतीशीलतेने पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र सोशल मिडीया पुणे जिल्हा महिला आघाडी च्या अध्यक्ष पदी इंदापुरच्या सौ. शितलताई विशाल सोनवणे (साबळे) यांची निवड करण्यात आली.
शितलताई या नेहमीच महिलांच्या व तरुणींच्या प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेत असतात इंदापुर तालुक्यातील अनेक महिलांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले प्रश्न सोडविले आहे त्यांच्या याच अनुभवाच फायदा पुणे जिल्ह्यातील सर्व महिला व तरुणींना व्हावा म्हणून त्यांची महाराष्ट्र सोशल मिडीया पुणे जिल्हा महिला आघाडी च्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल त्यांनी महाराष्ट्र सोशल मिडीया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. सतीशभाऊ साबळे यांचे आभार मानले.