महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

कांदलगाव उपसरपंचपदी सौ.तेजमाला बाबर यांची बिनविरोध निवड

कांदलगाव उपसरपंचपदी सौ.तेजमाला बाबर यांची बिनविरोध निवड
5 y 3 m 1 d 18 hrs 59 min 34 sec ago Indapur, Maharashtra, India

कांदलगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळू गिरी यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले होते. त्याकरिता आज उपसरपंच निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन सरपंच श्री.रविंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी सर्व सदस्य उपस्थित होते.

उपसरपंचपदासाठी सौ.तेजमाला बाबर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे सरपंच श्री. रविंद्र पाटील यांनी तेजमाला बाबर यांना उपसरपंच म्हणून घोषित केले. अध्यासी अधिकारी म्हणून ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी काम पाहिले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सभा घेण्यात आली.

यानंतर ग्रामपंचायत सदस्य विजय सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच श्री. रविंद्र पाटील यांच्या हस्ते वाफेचे मशीन व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.

यावेळी सदस्य उल्हास पाटील, किसन सरडे, बाळू गिरी, विजय सोनवणे, रेखा बाबर, कमल राखुंडे, कोंडाबाई जाधव, दशरथ बाबर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पांडुरंग इंगळे व संतोष बाबर यांनी प्रयत्न केले.

संबधित बातम्या