महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

कोरोनाच्या तडाख्यातून सावरण्यासाठी राज्य शासनाचे शर्थीचे प्रयत्न : माजी सभापती प्रवीण माने

ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर द्यावा; १८ ते ४४ वय असणाऱ्यांसाठी नवीन लसीकरण केंद्र बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुरू
कोरोनाच्या तडाख्यातून सावरण्यासाठी राज्य शासनाचे शर्थीचे प्रयत्न : माजी सभापती प्रवीण माने
May 13, 2021 08:07 PM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर : संपूर्ण देशावर येऊन आदळलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यापुढे आपली आरोग्य व्यवस्था तोकडी पडत आहे, तरी डॉक्टर, प्रशासन व राज्य सरकार या अटीतटीच्या प्रसंगातून महाराष्ट्र सावरण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रविण माने यांनी आरोग्य सेवक, डॉक्टर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत कोरोना परिस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. १८ ते ४४ वय असणाऱ्यांसाठी नवीन लसीकरण केंद्र बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुरू करण्यात आले आहे. याची पाहणी यावेळी प्रविण माने यांनी केली. तसेच यावेळी डॉक्टर व आरोग्य सेवकांशी वार्तालाप करत येथील संपूर्ण परिस्थितीचाही आढावा घेतला.

गेले कित्येक दिवस सातत्याने झटून काम करणाऱ्या आरोग्यसेवक, आरोग्यसेविका यांच्या कामाबद्दल त्यांच्याशी संवाद साधत माने यांनी त्यांचे विशेष आभार मानले, व उपस्थित नागरिकांनाही आपण आपली खबरदारी घेऊन राहू व सर्व आरोग्य सेवकांच्या प्रयत्नांना यश मिळवून देऊ असे आवाहन माने यांनी उपस्थितांना केले. याच सोबत सर्वांनी कोरोना लसीकरणासंदर्भात सर्व नागरिकांमध्ये जागृती करून ज्येष्ठांचे आवर्जून लसीकरण करून घेण्यासाठीही पुढाकार घ्या असे आवाहन केले.

बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पार पडलेल्या या बैठकीसाठी जि प सदस्य मोहन दुधाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील गावडे, सरपंच दादाराम काळेल, डॉ चंदनशिवे मॅडम, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका व इतर मान्यवर उपस्थित होते.

संबधित बातम्या