महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

राज्यमंत्र्यांच्या तालुक्यात वन खात्याचा भ्रष्ट व भोंगळ कारभार.

राज्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे वनाधिकाऱ्यांची चांदी.
राज्यमंत्र्यांच्या तालुक्यात वन खात्याचा भ्रष्ट व भोंगळ कारभार.
3 m 1 d 9 hrs 41 min 36 sec ago Indapur, Maharashtra, India

राज्यमंत्र्यांचा जाहीर निषेध करण्याचा शितलताई साबळे यांनी दिला इशारा.

विशेष प्रतिनिधी

इंदापुर : गेल्या महिन्याभरापासून वनखात्याच्या भ्रष्ट अधिकारी यांच्या विरोधात इंदापूर तालुका लहुजी शक्ती सेना महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. स्वाती राहुल आरडे ह्या करीत असलेल्या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा मिळत असून आज भाजप महिला मोर्चा आघाडीच्या कार्यकर्त्या शितलताई साबळे, इंदापूर चे माजी आमदार व मंत्री तसेच भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनीही पाठिंबा दिला.

इंदापुर वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वरिष्ठ अधिकारी राहुल पाटील तसेच आशुतोष शेंडगे यांच्या मनमानी, भ्रष्ट व भोंगळ कारभाराविरोधात वारंवार राज्यमंत्र्यांना निवेदन देऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही मात्र आंदोलनकर्त्यांनाच जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे.

गेल्या महिन्यात दहा फेब्रुवारी पासून राज्यमंत्र्यांच्या दारासमोर आंदोलन करत असताना मुख्य वनसंरक्षण अधिकारी यांच्या पत्रानुसार तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले होते व त्यावेळेस हमी देण्यात आली होती की भ्रष्ट अधिकारी यांच्यावर लवकरात लवकर कारवाई केली जाईल पण असे होताना दिसत नाही. त्याचाच परिणाम म्हणून पुन्हा एकदा सौ. स्वाती राहुल आरडे या इंदापुर वन अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसल्या आहेत.

जोपर्यंत वन खात्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालूच राहील अशी माहीती सौ. स्वाती राहुल आरडे यांनी दिली.

या आमरण उपोषणामुळे सौ. स्वाती राहुल आरडे यांची प्रकृती खालावली असुन लवकरात लवकर त्यांना उपचार न मिळाल्यास प्रकृती अजुन खालावु शकते.

यावेळी बोलताना भाजपच्या पुणे जिल्हा महिला मोर्चा कार्यकारिणी सदस्या शितलताई साबळे म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकार नेहमीच भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे. याविषयी आम्ही वारंवार निवेदन देऊनही कोणतीच कारवाई होताना दिसत नाही हे जर असंच चालू राहिलं तर आम्ही राज्य वनमंत्री यांचा सोमवारी भाजप महिला आघाडी मोर्चा यांच्या वतीने जाहीर निषेध करु. याबाबत त्यांनी राज्य वनमंत्री यांच्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडुन कोणताही प्रतिसाद येताना दिसून येत नाही याचाच अर्थ ते जाणून-बुजून वन अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे असं दिसून येतं.

जर याबाबत वनमंत्र्यांनी लवकरात लवकर कोणतीही कारवाई केली नाही तर त्यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असेही शितलताई साबळे म्हणाल्या.

संबधित बातम्या