महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

भारतीय दलित संसद च्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी महादेव मिसाळ यांची निवड

भारतीय दलित संसद च्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी महादेव मिसाळ यांची निवड
April 20, 2021 03:54 PM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर : प्रतिनिधी

सामाजिक कार्यकर्ते महादेव मिसाळ यांची भारतीय दलित संसद ,महाराष्ट्र च्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.अंबादास सगट यांनी महादेव मिसाळ यांना निवडीचे पत्र दिले आहे. भा.द.संसद या सामाजिक व संवैधानिक न्यायाच्या चळवळीत आपले मोलाचे योगदान राहील,असे स्पष्ट करत सगट यांनी मिसाळ यांना निवडीचे पत्र दिले आहे. इंदापूर तालूक्यातील बाभुळगाव येथून सामाजिक कार्यात सुरुवात केलेल्या सामाजिक कार्यकर्ते महादेव मिसाळ यांचा सामाजिक व राजकीय प्रवासात त्यांनी विशेष छाप ठेवली आहे. अनेक सामाजिक प्रश्नांसाठी मोर्चे, आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे.पुर्वी दलित स्वयंसेवक संघात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अंबादास सगट,कार्याध्यक्ष प्रा.बी.डी.खोतकर व राज्य सरचिटणीस तथा मराठवाडा संपर्क प्रमुख किशोर दणके यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात भारतीय दलित संसद ची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित पुणे जिल्हा अध्यक्ष महादेव मिसाळ यांनी सांगितले.

संबधित बातम्या