महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

ग्रामपंचायत सरडेवाडी झाली कॅशलेस.

ग्रामपंचायत सरडेवाडी झाली कॅशलेस.
2 m 10 hrs 14 min 18 sec ago Indapur, Maharashtra, India

सरडेवाडी: ग्रामपंचायतीच्या वतीने महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन गटविकास अधिकारी श्री. विजय परिट व सरपंच श्री.सिताराम जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीची करवसुली यंत्रणा कॅशलेस पद्धतीने करण्यास सुरूवात करण्यात आली. याचा शुभारंभ सरपंच सिताराम जानकर यांनी ऑनलाईन पद्धतीने करभरणा करून केला.

यावेळी गटशिक्षणाधिकारी बामणे,अधिक्षक फलफले, उपसरपंच हनुमंत जमदाडे, सदस्य रविंद्र सरडे, गोकुळ कोकरे, सतीश चित्राव, सुप्रिया कोळेकर,वैशाली शिद, प्रियंका शिद, अलका कडाळे, विष्णु कोळेकर, नामदेव तोबरे, विजय शिद, आप्पासाहेब माने, अंगणवाडी सेविका दक्षता ढावरे, अलका ढावरे, ताराबाई सिताफ, किशोर कडाळे उपस्थित होते.

यावेळी बोलताना गटविकास अधिकारी श्री.परिट म्हणाले की, कोरोना काळात सरडेवाडी ग्रामपंचायतीने कॅशलेस करवसुली यंत्रणा राबवून एकप्रकारे वेगळा आदर्श तालुक्यासमोर ठेवला आहे, त्याबद्दल सर्व ग्रामपंचायत कार्यकारिणीचे अभिनंदन करतो. तसेच सरडेवाडीच्या ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनीदेखील ग्रामपंचायत कॅशलेस करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला, हा उपक्रम कौतुकास्पद आहे.यावेळी बोलताना सरपंच जानकर म्हणाले की, महामानव डाॅ.आंबेडकर यांच्या प्राॅब्लेम ऑफ रूपी या पुस्तकावरून रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली, बाबासाहेब अर्थतज्ञ होते.

आज ग्रामपंचायतीने करवसुली कॅशलेस पद्धतीने करून महामानव बाबासाहेबांना एक आगळीवेगळी आदरांजली वाहिली आहे.

यावेळी ग्रामसेविका स्वाती चव्हाण म्हणाल्या की, ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी अंगणवाड्या आयएसओ मानांकित करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. आजच्या दिवशी जाधव-भगत वस्तीवरील प्रगती बालकमंदिर या अंगणवाडीला आयएसओ मानांकन मिळाले आहे, ग्रामपंचायतीने दिलेल्या सूचनाप्रमाणे अंगणवाडीसेविका दक्षता ढावरे यांनी पूर्तता केल्याने अंगणवाडीला आयएसओ मानांकन मिळाले आहे. आभार अतुल ढावरे यांनी मानले.

संबधित बातम्या