महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

भाजपच्या सहकार्याने सोडवलेले डीपी पुन्हा बसवले.

भाजपच्या सहकार्याने सोडवलेले डीपी पुन्हा बसवले.
March 23, 2021 09:43 AM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर: कोरोना संकटामुळे वीज बील न भरल्याने महावितरण ने डीपी सोडवण्याचे प्रकार सुरू आहेत आधीच कोरोना संकट त्यात अवकाळी पाऊस अश्या दुहेरी संकटात आता विजेची समस्या अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वाली कोण असा प्रश्न पडला.

महाविकास आघाडी सरकारने वीज बिलावर अजून ठोस तोडगा काढलेला नाही व त्यातच महावितरणने मौजे हनुमंत वाडी, हगारवाडी येथील डीपी सोडवले होते. यावेळी तेथील शेतकऱ्यांनी भारतीय जनता पार्टी प्रदेश चिटणीस पंचायत आघाडी युवराज आण्णा मस्के यांची भेट घेऊन त्यावर तोडगा काढायला सांगितला यावर पंधरा शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने बिल भरणे कबूल केले त्यावर युवराज आण्णा मस्के यांनी मा. सूळ साहेबांना सांगून डीपी जोडायला लावले.

यावेळी भाजपा प्रदेश चिटणीस, पंचायत आघाडी युवराज आण्णा मस्के, भाजपा पुणे जिल्हा महिला अध्यक्षा, सदस्या शितलताई साबळे, ज्योतीताई डहाळे आदी उपस्थित होत्या.

संबधित बातम्या