महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

'लता भगवान करे, एक संघर्ष कथा' या चित्रपटाला 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात विशेष पुरस्कार.

राज्याच्या प्रौढ व अल्पसंख्याक शिक्षण संचालनायाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते चित्रपटाच्या टीम चा बारामतीत गौरव.
'लता भगवान करे, एक संघर्ष कथा' या चित्रपटाला 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात विशेष पुरस्कार.
March 29, 2021 02:39 PM ago Baramati, Maharashtra, India

बारामती: पतीच्या आजारपणाच्या खर्चासाठी इतरांवर अवलंबुन न राहता बारामती महिला मॅरोथोन मध्ये भाग घेत प्रथम क्रमांक पटकवलेल्या लता भगवान करे यांच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट 'लता भगवान करे, एक संघर्ष कथा' या चित्रपटाला 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात विशेष पुरस्कार मिळाला.

ग्रामीण भागातल्या असलेल्या लता करे यांनी आपल्या पतीच्या आजारपणासाठी केलेल्या खऱ्याखुऱ्या संघर्षाचे चित्रण असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता त्याचीच पोहच पावती म्हणून त्याला 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात विशेष पुरस्कार मिळाला.

चित्रपटाच्या व खऱ्याखुऱ्या आयुष्याच्या नायिका लता करे, दिग्दर्शक नवीन देशबोइना, गीत व संगीतकार प्रशांत महामुनी, गायिका गिरिजा महामुनी यांचा राज्याच्या प्रौढ व अल्पसंख्याक शिक्षण संचालनायचे उपसंचालक राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते रविवारी बारामतीत गौरव करण्यात आला.

या चित्रपटाची निर्मिती ए. कृष्णा अरुबोधु यांची असून दिग्दर्शन नवीन देशबोइना यांचे आहे, तसेच कार्यकारी निर्माता म्हणून बारामतीचे सुपुत्र अतुल साबळे, निर्मिती व्यवस्थापक म्हणून प्रवीण बर्गे यांनी काम पाहिले तर स्थिरचित्रण प्रतीक कचरे यांनी केले आहे.

बारामती सारख्या भागात नवनवीन चित्रपटांची निर्मिती होत असून त्यांच्याबरोबर काम करताना नेहमी एक नवीन ऊर्जा मिळते. आणी याच ऊर्जेमुळे आम्ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारापर्यंत मजल मारू शकलो.

अतुल साबळे,

कार्यकारी निर्माता, बारामती.

संबधित बातम्या