महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

कांदलगावात संस्थात्मक विलगीकरण कक्ष स्थापन

कांदलगावात संस्थात्मक विलगीकरण कक्ष स्थापन
May 11, 2021 05:24 PM ago Indapur, Maharashtra, India

कांदलगाव, इंदापुर : ग्रामपंचायत कांदलगावच्या वतीने गावातील जिल्हा परिषद शाळेत संस्थात्मक विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, या कक्षाचे उद्घाटन गावचे सरपंच श्री.रविंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य उल्हास पाटील, किसन सरडे, बाळू गिरी, विजय सोनवणे, तेजमाला बाबर, रेखा बाबर, कमल राखुंडे, कोंडाबाई जाधव, दशरथ बाबर, आशा सेविका रूक्साना शेख, ग्रामसेविका स्वाती चव्हाण, पोलीस पाटील शैलजा पाटील उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना सरपंच पाटील म्हणाले की,गावातील कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात यावी तसेच रूग्णांना तात्काळ प्राथमिक उपचार मिळावेत या हेतुने गावातच विलगीकरण कक्ष करण्याचे नियोजन ग्रामपंचायतीने केले आहे. यामध्ये नऊ बेड ठेवले आहेत तसेच वीज, पाणी सुविधा व आरोग्य विभागाकडून औषधे सुविधा देण्यात येणार आहे तसेच गावातील डाॅ.बाजीराव ढवळे व डाॅ.सचिन बाबर हे स्वेच्छेने विलगीकरण कक्षासाठी सेवा देणार आहेत तशी हमी त्यांनी ग्रामपंचायतीला दिली आहे. तरी कुणालाही कोरोना लक्षणे आढळली तर लगेच तपासणी करून घ्या व काळजी घ्या असे आवाहन केले.

तसेच यावेळी ग्रामसेविका स्वाती चव्हाण म्हणाल्या की, गावात यापूर्वी ४५ ते ६० वयोगटातील ८५% लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या १८ते४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पळसदेव आरोग्य केंद्रात चालू आहे. तरी सर्वांनी लसीकरण करून कोरोनामुक्तीच्या लढाईत भाग घ्यावा. आजघडीला प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे हाच एकमेव कोरोनापासून वाचण्याचा पर्याय आहे. पांडुरंग इंगळे व संतोष बाबर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

संबधित बातम्या