महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

सरडेवाडी ग्रामपंचायत ॲक्शन मोडवर; संपूर्ण गावात केली सोडिअम हायपोक्लोराईडने जंतुनाशक फवारणी

सरडेवाडी ग्रामपंचायत ॲक्शन मोडवर; संपूर्ण गावात केली सोडिअम हायपोक्लोराईडने जंतुनाशक फवारणी
May 01, 2021 02:28 PM ago Indapur, Maharashtra, India

सरडेवाडी, इंदापुर : ग्रामपंचायत सरडेवाडीची मासिक सभा नुकतीच ऑनलाईन पद्धतीने झूम ॲपवर पार पडली. मीटींगमध्ये झालेल्या ठरावांची अमंलबजावणी म्हणून संपुर्ण सरडेवाडी गाव सोडियम हायपोक्लोराईडने फवारणी करण्यात आली.

यावेळी सरपंच सिताराम जानकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन फवारणी केली. यावेळी बोलताना ग्रामसेविका स्वाती चव्हाण म्हणाल्या की, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ग्रामपंचायतीच्या सर्वच सदस्यांनी 'माझा वाॅर्ड, माझी जबाबदारी' अभियानांतर्गत आपआपल्या वाॅर्डाची जबाबदारी वाटून घेतली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे सोयीस्कर झाले आहे. सरडेवाडीत यापूर्वीच ९५% लसीकरण पूर्ण झाले आहे.

यावेळी उपसरपंच हनुमंत जमदाडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य सतीश चित्राव, रविंद्र सरडे, गोकुळ कोकरे, प्रियंका शिद, वैशाली शिद, सुप्रिया कोळेकर, वैशाली कोळेकर, वैशाली शिद, गयाबाई तोबरे, अलका कडाळे या सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

ज्या घरी कोविड पाॅझिटिव्ह पेशंट सापडला आहे, त्या घरातील सर्वांना सक्तीने गृह विलगीकरणात राहण्याचे आदेश ग्रामपंचायतीने बजावले आहेत, ग्रामपंचायतीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सिताराम जानकर सरपंच, ग्रामपंचायत सरडेवाडी.

सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावामध्ये एकही व्यक्ती पाॅझिटिव्ह निघण्याआधीच उपाय करण्याचे नियोजन ग्रामपंचायतीने केले आहे.

हनुमंत जमदाडे उपसरपंच, ग्रामपंचायत सरडेवाडी

संबधित बातम्या