महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

सरपंच सिताराम जानकर यांच्या अध्यक्षतेखाली सरडेवाडी ग्रामपंचायतीची ऑनलाईन मासिक सभा संपन्न

सरपंच सिताराम जानकर यांच्या अध्यक्षतेखाली सरडेवाडी ग्रामपंचायतीची ऑनलाईन मासिक सभा संपन्न
April 30, 2021 01:36 PM ago Indapur, Maharashtra, India

सरडेवाडी, इंदापुर : सध्या सगळीकडे कोविड१९ च्या वाढत्या प्रार्दुभावामुळे शासन आदेशानुसार सरडेवाडी ग्रामपंचायतीची मासिक सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडली. अध्यक्षस्थानी सरपंच सिताराम जानकर होते.

यावेळी उपसरपंच हनुमंत जमदाडे, सदस्य रविंद्र सरडे, सतीश चित्राव, गोकुळ कोकरे, सुप्रिया कोळेकर, अलका कडाळे, वैशाली शिद, वैशाली कोळेकर, गयाबाई तोबरे, प्रियंका शिद व ग्रामसेविका स्वाती चव्हाण उपस्थित होत्या.

यावेळी प्राधान्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कोणत्या व कशा कराव्यात यावर सर्व सदस्यांनी आपले मत मांडले. त्यामध्ये जंतुनाशक फवारणी, सक्तीने गृहविलगीकरण, तसेच सर्वेक्षण करणे या सर्व उपायांचा अवलंब करण्याच्या सूचना सदस्यांनी मांडल्या. तसेच इतर विषयांवरही चर्चा करण्यात आली. सभा खेळीमेळीत पार पडली.

सरपंच सिताराम जानकर यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानले. ऑनलाईन मासिक सभा घेतल्यामुळे सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केले.

संबधित बातम्या