महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

डॉक्टर बनले देवदूत

डॉक्टर बनले देवदूत
May 01, 2021 10:35 AM ago Nanded, Maharashtra, India

वसीम शहापुरकर

देगलूर तालुक्यातील शहापुर येथील रहिवासी डॉक्टर पवण प्रकाश भूपतवार यांनी कोविड १९ या महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता रूग्णांची तपासणी करत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी शासकिय मेडिकल कॉलेज जे. जे.रूग्णालय मुंबई येथे MBBS व DCH ची परीक्षा देऊन माघील कोरोनाच्या काळात सोलापूर येथील अश्विनी रुग्णालय येथे यापूर्वी कोरोनाच्या काळात ३ महीने कोविड १९ सेंटर वर अनुभव घेऊन आपल्या गावाकडे निघाले होते आपल्या गावाकडे आले आसता तेवढयात लॉकडाऊन लागले व ते गावीच राहिले व त्यांचे वडिल प्रकाश भूपतवार यांनी आपल्या मुलाला सांगितले की गावतील डॉक्टर असून सुद्धा नाहीत अशा वेळी तु अपल्या गावकऱ्याचे व गरीब लोकांची मदत होईल अशी कही तरी व्यवस्था होईल असे काही तरी कर मग डॉक्टर साहेबांनी आपल्या वडिलांचे गोष्ट ऐकून आपल्या मित्राच्या मेडीकलच्या पाठीमागे एक रिकामी खोली होती मग त्यांनी आपल्या एका मित्राच्या सहकार्यने एक छोटासा दवाखाना सुरू केला आणि स्वतःच आता रुग्णांना उपचारासाठी पाहणीला सुरुवात केली.

आजही गावखेड्यांत डॉक्‍टरास परमेश्वराचे रूप मानले जाते. दुर्धर आजारातून मुक्त झाल्यावर किंवा अपघातानंतर मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा जीवन सुरळीत झाल्यानंतर अनेकांना डॉक्‍टरांमुळे पुनर्जन्म मिळाला, अशी भावना असते. ते तसे बोलूनही दाखवितात. अनेक रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाइकांसाठी डॉक्‍टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला 'देवदूत' ठरत असतो. त्यांच्या कौशल्याने, ज्ञानाने अनेकांना जीवदान मिळते. अशा काळात त्यांनी हे कार्य करून योग्य औषधोपचार करत असल्याबद्दल सरपंच, ग्रामपंचायत शहापूर तर्फे त्यांचे स्वागत आभार व शुभेच्छा व प्रमाणात देण्यात आले.

संबधित बातम्या