महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

स्पर्धा परिक्षेचा अभ्यास म्हणजे व्यक्तिमत्व विकासाची प्रक्रिया आहे-डाॅ.सतीश पाटील

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिम्मित आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेत प्रतिपादन.
स्पर्धा परिक्षेचा अभ्यास म्हणजे व्यक्तिमत्व विकासाची प्रक्रिया आहे-डाॅ.सतीश पाटील
2 m 9 hrs 56 min 24 sec ago Indapur, Maharashtra, India

इंदापुर : कांदलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात सतीश पाटील बोलत होते. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास, पुस्तकांची निवड, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, सराव याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रामाणिकपणाने कष्ट केले तर स्पर्धा परिक्षेत नक्कीच यश मिळते.

तसेच पहिल्या सत्रातील लसीकरण महत्व व कोविड काळातील प्रतिबंधात्मक उपाययोजना व्याख्यात्या डाॅ. सुवर्णा शिंदे म्हणाल्या की, कोरोना होऊ नये यासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे, तसेच कोविड लस घेणेदेखील गरजेचे आहे. सर्वांनी कोविड लस घेण्याचे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.

संबधित बातम्या