महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

रमजान ईद निमित्ताने २५०० लिटर दुधाचे वाटप; माजी सभापती प्रवीण माने यांचा पुढाकार

रमजान ईद निमित्ताने २५०० लिटर दुधाचे वाटप;  माजी सभापती प्रवीण माने यांचा पुढाकार
1 m 14 hrs 32 min 58 sec ago Indapur, Maharashtra, India

प्रतिनिधी अहमद शेख

इंदापुर : कोरोना आता ही काही तात्पुरती चिंतेची बाब राहीली नसून जन सामान्यांच्या रोजच्या आयुष्याला वळण देणारी एक कडी ठरत आहे. माणसांना माणसांपासून विलग होऊन राहणे सध्यातरी कोरोनाचे एवढे एकमेवच निदान आहे. असे असले तरी नागरिकांच्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या घटना व समारंभ, सणवार या गोष्टी या आजारापासून बचावासाठी आवश्यक असणाऱ्या आचार संहितेच्या चौकटींत राहून आपण आपल्या कुटुंबासमवेत आपापल्या घरांतून हे सण साजरे करूच शकतो. कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक गणितं कोसळली असली तरी सण साजरा व्हावा व या संकटाच्या काळातही नागरिकांच्या आयुष्यात गोडवा मिसळता यावा या उद्देशातून मा. बांधकाम व आरोग्य समिती सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांच्या माध्यमातून सोनाई परिवाराच्या वतीने रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांसाठी ३००० लिटर दुधाचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले.

यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत सर्व नागरिकांना इंदापूर शहरातील श्रीराम चौक व इंदापूर कसबा अशा विविध भागातून दूध वाटप करण्यात आले असून, याही वेळी सर्व नागरिकांना आपापली काळजी घ्यायला सांगत ज्येष्ठांना कोरोना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्याविषयीचे आव्हान प्रवीण माने यांच्या वतीने त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

या दूध वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने यावेळी समीर पठाण, निहाल पठाण, आक्रम शेख, मोआज पठाण, निहाल शेख व इतर मान्यवर सहकारी उपस्थित होते.

संबधित बातम्या