महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

सोशल मिडीयाचा वापर करून मराठा सहकार्य समूहाने १५ दिवसात २०० जणांना दिली प्लाझ्मा रूपी जीवन संजीवनी.

सोशल मिडीयाचा वापर करून मराठा सहकार्य समूहाने १५ दिवसात २०० जणांना दिली प्लाझ्मा रूपी जीवन संजीवनी.
May 15, 2021 08:43 AM ago Maharashtra, India

मराठा सहकार्य समूहाने गेल्या १५ दिवसात कमीत कमी २०० जणांना plasma उपलब्ध करून दिले आहेत.

आजवर आपण WhatsApp किंवा सोशल मिडीया कस चुकीचं हेच सहसा ऐकत आलो आहोत पण याच WhatsApp चा वापर करून अभिजित ढवाण, हेमंत जगताप, वैभव काटकर, निलेश माने, गणेश चौधरी, स्वप्नील तावरे, मयुर चव्हान या तरूणांनी तुमचा हेतू चांगला असेल तर समाजसेवेसाठी सोशल मिडियाचा वापर कसा केला जाऊ शकतो याच एक जिवंत उदाहरण आपल्यासमोर ठेवल आहे.

गेल्या काही महन्यापुर्वी या तरूणांनी मिळून मराठा सहकार्य समुह हा ग्रुप काढला आणि या मार्फतलॉक डाऊन च्या अगोदर ज्या गरीबांना रक्त लागत होते अशा जवळपास ५० च्या वर गरजूंना २ महिन्यात १००% सवलती मध्ये रक्त मिळवून दिले आहे.

गेल्या ५ महिन्यात या समूह तर्फे जवळपास १० रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आणि यामध्ये ५०० पेक्षा जास्त रक्त दात्यांनी रक्तदान केले आहे. तसेच गेल्या १५ दिवसांमध्ये मराठा सहकार्य समूहाने गेल्या १५ दिवसात कमीत कमी २०० जणांना plasma उपलब्ध करून दिले आहेत.

याकामी त्यांना नितीन काळे, संभाजी माने, प्रज्ञा काटे, प्रसाद शेळके, नाना शेळके यांची मोलाची साथ मिळाली.

संबधित बातम्या