महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

'महाराष्ट्रदिनी कांदलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनामुक्तीचा जागर'

'महाराष्ट्रदिनी कांदलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनामुक्तीचा जागर'
May 01, 2021 02:35 PM ago Indapur, Maharashtra, India

"मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण हेच कोरोनामुक्तीचे साधन आहे"- डाॅ.जाधवर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र पळसदेव

कांदलगाव, इंदापुर : ग्रामपंचायत कांदलगावच्या वतीने महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून "जागर कोरोनामुक्तीचा, तुमच्या माझ्या आरोग्याचा" या विषयावर पळसदेव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. रणजीत जाधवर यांनी मार्गदर्शन केले.

सर्वप्रथम कोरोनाच्या लक्षणांविषयी माहिती सांगितली. लोकांनी कोरोनाला विनाकारण घाबरून जाऊ नये, लक्षणे लपवू नका. मला काही होत नाही, असा अतिआत्मविश्वास बाळगू नका. वेळेवर उपचार घेणे गरजेचे आहे. कोरोना हा बरा होणारा रोग आहे. त्यामुळे वेळेवर उपचार घेणे आणि प्रतिबंधात्मक काळजी घेणे हाच एकमेव पर्याय आहे. सध्या ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत, त्यामुळे कोरोना होऊ नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. योग्य आहार, व्यायाम, वेळेवर उपचार तसेच प्रतिबंधात्मक काळजी घेणे या सगळ्या उपायातून कोरोना रूग्ण बरे होऊ शकतात, घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. ५०% रूग्ण हे कोरोना झालाय, या भितीने मरत आहेत. त्यामुळे घाबरून जाऊ नका. लसीकरण करणे हाच एकमेव पर्याय सध्यातरी कोरोनापासून बचाव करण्यासाठी आहे. अशाप्रकारे "जागर कोरोनामुक्तीचा, तुमच्या माझ्या आरोग्याचा" या विषयावर सर्वसमावेशक माहिती डाॅ.जाधवर यांनी दिली.

सरपंच रविंद्र पाटील व ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला. सर्व ग्रामस्थांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले.

संबधित बातम्या