महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

कोरोना परिस्थिती हाताळण्यास तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा अपयशी - हर्षवर्धन पाटील

भिगवण ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पन्नास ऑक्सिजन बेड मागणी करून देखील अद्याप सुविधा नाही
कोरोना परिस्थिती हाताळण्यास तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा अपयशी - हर्षवर्धन पाटील
April 17, 2021 09:28 AM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर प्रतिनिधी (अहमद शेख)

इंदापुर तालुक्यासह राज्यांमध्ये सध्या कोरोनाचा कहर सुरु आहे. त्या पार्श्वभुमीवर भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटरमधील कोविड सेंटरमध्ये पन्नास ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी भाजपा नेते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, भिगवण ग्रामपंचायत व इंदापुर पंचायत समिती आदींच्या वतीने करण्यात आली होती परंतु अद्याप देखील या ठिकाणी ऑक्सीजन बेड उपलब्ध झाले नाही.

तालुक्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णासाठी बेड उपलब्ध नाही, औषध इंजेक्शनचा पुरवठा उपलब्ध नाही, कोरोना रुग्णाला खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे.

कोरोना परिस्थिती हाताळण्यात सरकारी यंत्रणा हतबल असल्याने रुग्णावर आर्थिक भार पडत असल्याने तालुक्याची कोरोना संदर्भातली परिस्थिती हाताबाहेर गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ताबडतोब कोरोना रुग्णासाठी भिगवणला 50 ऑक्सिजन बेड तसेच औषधांचा पुरवठा आणि कोरोना रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयात दाखल करून घेण्याची यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

संबधित बातम्या