महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

इंदापूर येथील श्रावणबाळ आश्रमास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप : माजी सभापती प्रविण माने यांचा पुढाकार

एक हात मदतीचा, सामाजीक बांधिलकीचा या उपक्रमाअंतर्गत माजी सभापती प्रविण माने यांचा पुढाकार
इंदापूर येथील श्रावणबाळ आश्रमास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप : माजी सभापती प्रविण माने यांचा पुढाकार
May 15, 2021 02:59 PM ago Indapur, Maharashtra, India

प्रतिनिधी अहमद शेख

इंदापुर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच गोष्टींची वानवा झाली असताना, समाजाच्या हितासाठी सदैव झटणाऱ्या सामाजिक संस्थांनाही याबाबत बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिथे मोठमोठ्या संस्था, कंपन्या यांची आर्थिक घडी कोलमडली असताना लहान मोठ्या संस्थांनाही या आर्थिक विवंचनेस तोंड द्यावे लागत आहे. इंदापूर येथे अशाच पद्धतीने कार्यरत असणाऱ्या श्रावणबाळ आश्रम श्रीराम मंदिर या संस्थेत २० मुले-मुली वास्तव्यास आहे. कोरोनामुळे या संस्थेचे आर्थिक गणित डगमगले असल्याची माहिती कानी आली असता पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांनी या श्रावणबाळ संस्थेस जीवनावश्यक किराणा मालाचे वाटप याचसह स्टेशनरी साहित्य देऊ केले. अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांचे संगोपन करणाऱ्या या श्रावणबाळ आश्रम श्रीराम मंदीर संस्थेचे व्यवस्थापन राजू कर्डे महाराज व विशाल कर्डे महाराज बघत असतात.

कोरोनाची ही आपत्ती साऱ्या जगावर कोसळली असली तरी आपण आपले सामाजिक भान जपत शक्य त्या सर्वांनाच मदतीचा हात पुढे करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यावेळी माने यांनी केले. या सोबतच इथून पुढे या श्रावणबाळ संस्थेच्या दररोजच्या दूधाचीही सोय माने यांनी लावली असून इथुन पुढे सोनाईच्या वतीने दररोज दूधही देण्यात येणार असल्याचे यावेळी प्रविण माने यांनी यावेळी जाहीर केले.

आजच्या या वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रविण माने यांच्यासह Adv. सचिन राऊत, साधू नरुटे, विजय पाटील, गौरव पवार, प्रविण निगडे, या आश्रमाचे व्यवस्थापक राजू कर्डे महाराज, विशाल कर्डे महाराज उपस्थित होते.

संबधित बातम्या