महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

भवानीनगर बनतंय अपघात क्षेत्र.

कारखाना परिसरात घडतेय रोजच अपघातांची मालिका.
भवानीनगर बनतंय अपघात क्षेत्र.
March 19, 2021 03:42 PM ago Indapur, Maharashtra, India

भवानीनगर (ता. इंदापुर) : भवानीनगर भागात काहीना काही अपघात रोजच घडत असतात. कधी रस्ते अपघात तर कधी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यात घडाणाऱ्या मानवी चुकामुळे होणारे अपघात. यात कोणाचा बळी तर जातोय किंवा गंभीर जखमी तर होतात. मागील 4-5 दिवसात रस्ते अपघातांची संख्या वाढत आहे.

अशातच श्री. छत्रपती सहकारी साखर कारखान्यात क्रेन ऑपरेटर व इतर सहकारी ऑपरेटर यांच्या दुर्लक्षपणामुळे ट्रॅक्टर चालक श्री. अक्षय शिवाजी वायदंडे याला क्रेन चा धक्का लागुन गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला तेथील कामगारांनी दि. 15 रोजी जगन्नाथ हाॅस्पिटल, बारामती या ठिकाणी ऍडमिट ही केला पण त्यानंतर श्री. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा कोणताही जबाबदार व्यक्ती त्याला हॉस्पिटला भेट देण्यास गेला नाही की त्याची कोणतीही विचारपूस केली नाही.

या घटनेनंतर दि.17 रोजी श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक प्रतिनिधी, ट्रॅक्टर मालक, ऑपरेटर, वायदंडे कुटूंबीय यांची बैठकही झाली.

या बैठकीमधे ऑपरेटर अमर निंबाळकर व इतर ऑपरेटर यांची चुकी कारखाना ट्रॅक्टर मालक यांनी पुराव्या सहित क्रेन ऑपरेटर यांची चुकी सिध्द केली तरी देखील क्रेन ऑपरेटर व इतर सहकारी चुक मान्य करत नाहीत.

ट्रॅक्टर चालक श्री. अक्षय शिवाजी वायदंडे हे गंभीर जखमी असल्यामुळे त्यांच्या हाताचे तात्काळ ऑपरेशन करणे गरजेचे आहे, तरी कारखाना संचालक मंडळ यांनी कारखान्यामार्फत त्याच्या उपचाराचा खर्च उचलावा.

जर या बाबतीत कारखाना संचालक मंडळ यांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला व त्यात काही दुदैवी प्रकार घडल्यास याला सर्वस्वी कारखाना कारणीभुत असेल तसेच या अपघात प्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई तात्काळ करावी अशीही मागणी ट्रॅक्टर चालक श्री.अक्षय शिवाजी वायदंडे यांच्या कुटुंबीयांनी व मातंग नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री . लोकनेते म्हस्कु आण्णा शेंडगे यांच्या आदेशानुसार मातंग नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली.

संबधित बातम्या