महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

समाज उन्नतीसाठी कार्यरत पाच महामंडळांना ५०० कोटींचा निधी मंजूर.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची विधीमंडळात घोषणा.
समाज उन्नतीसाठी कार्यरत पाच महामंडळांना ५०० कोटींचा निधी मंजूर.
5 y 4 m 1 d 16 hrs 9 min 41 sec ago Mumbai, Maharashtra, India

मुंबई, दि. 10 :- समाजातील विविध घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या व राज्यात नवनवीन उद्योग व्यवसायासाठी चालना देण्यासाठी विविध महामंडळांसाठी 500 कोटींचा निधी मंजुर झाला आहे.

यामध्ये

१) संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ- १०० कोटी.

२) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ- १०० कोटी.

३) महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ- १०० कोटी.

४) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळीमेंढी विकास महामंडळ- १०० कोटी.

५) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ- १०० कोटी.

या महामंडळांना एकूण ५०० कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज विधिमंडळात केली.

अर्थसंकल्पावरील चर्चेला विधिमंडळात उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही माहिती दिली.

संबधित बातम्या