महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

अगोदर माणसांना जगू द्या... मग ऑक्सिजन पुरवठा बंद करा... - संभाजी ब्रिगेड

अगोदर माणसांना जगू द्या... मग ऑक्सिजन पुरवठा बंद करा... - संभाजी ब्रिगेड
May 29, 2021 06:40 PM ago Indapur, Maharashtra, India

विशेष प्रतिनिधी पुणे (अहमद शेख)

ऑक्सिजनचे महत्त्व कोरोना महामारीमुळे प्रत्येकाला समजलं. ऑक्सिजन अभावी फक्त महाराष्ट्रात हजारो लोकं तडफडून मरण पावली. अडचणीच्या काळात उद्योग व्यवसायासाठी चालणारा कंपन्यातील ८०% ऑक्सीजन माणसांना वापरला गेला. इतर राज्यातून तसेच परदेशातून सुद्धा ऑक्सिजन अडचणीच्या काळात मागवावा लागला. महाराष्ट्रावरचे संकट अजून तळलेले नाही वेगळी वेगळी महामारी तोंड वर काढत आहे. त्यामुळे सध्याची औद्योगिक ऑक्सिजन वापरण्याची परिस्थिती काही काळ चालूच ठेवली पाहिजे. कारण कोरोना रुग्णांचा आकडा सध्या जरी कमी असला तरी ही वादळापूर्वीची शांतता आहे...! लाॕकडाऊन उठवून लोकांना जर बाहेर पडण्याच्या सवलती मिळाल्या परत कोरोना महामारी पसरू शकते. उद्योग, कामगार जगलाच पाहिजे. मात्र त्याअगोदर माणसाचा जीव सर्वश्रेष्ठ आहे. माणूस जिवंत राहिला तर सगळं व्यवस्थित चालू राहू शकतं. त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी व महाराष्ट्र सरकार यांना विनंती आहे की, औद्योगिक व्यवसाय चालू करण्याच्या गडबडीत माणसाचा ऑक्सिजन बंद करू नका.

महाराष्ट्र अजूनही कृत्रिम ऑक्सिजन स्वयंपूर्ण नाही. कोरोना काळात औद्योगिक कंपन्यांमधील ऑक्सिजन वापरावर निर्बंध घालण्यात आले होते. कोरोना रुग्णालयांमध्ये औद्योगिक कंपनींमधील सुमारे 80 टक्के वापरला जात होता. मात्र, आता कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. तसेच, ऑक्सिजनची मागणीही कमी झाली आहे. महामारी चा प्रादुर्भाव पाहता परत रुग्णांची संख्या वाढू शकते त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गडबडीत त्यामुळे औद्योगिक कंपन्यांना ऑक्सिजन पुरवठा पुर्ववत करण्याचा निर्णय घेऊ नये महाराष्ट्रातील जनता आजही ऑक्सिजन बेड साठी तडफडत आहे, हे विसरून चालणार नाही.

संबधित बातम्या