महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

मयूर चव्हान सर एक विना वर्दीवाला कोविड योद्धा

विश्वजण आरोग्यसेवा समिती व अनेक सामाजिक संस्थाबरोबर निस्वार्थ काम करणारा एक सच्चा COVID योद्धा
मयूर चव्हान सर एक विना वर्दीवाला कोविड योद्धा
1 m 9 hrs 10 min 32 sec ago Baramati, Maharashtra, India

बारामती : कोरोना सारख्या महामारी मध्ये डॅाक्टर नर्स पोलिस प्रशासन हे सर्व COVID योद्धे म्हणून काम करत आहेत.त्यांना त्याचा मोबदला मिळतो आहे. पण काही लोक निस्वार्थ कोणताही मोबदला न घेता समाजसेवा म्हणून काम करत आहेत असाच एक योद्धा म्हणजे मयूर चव्हाण सर.

मयूर सर सुरवातीपासूनच सामाजिक कार्यात सक्रिय आहेत माझी आणि त्यांची ओळखही याच माध्यमातून झाली आमच्या एका मित्राच्या नातेवाईकांना अकलूजमध्ये ब्लडची गरज होती ते मिळत नव्हते तेव्हा एका मित्राने मयूर सरांच नाव सुचवल आणि मयूर सरांनी काही मिनिटांमध्ये ते मिळवून दिलं. अशी बऱ्याच वेळा त्यांनी मदत मिळवून दिली.

कोविडच्या या कठीन काळात पेशंटला बेड, ॲाक्सिजन सिलेंडर, इंजेक्शन अशी जमेल ती मदत ते मिळवून देत आहेत. त्यांनी अत्ता पर्यंत १०० पेक्षा जास्त रक्तदान शिबिरांच आयोजन केल आहे. अशा या कोविड योद्ध्याला महाराष्ट्र सोशल मिडीयाचा सलाम.

शब्दांकन :- शुभम वाघ

संबधित बातम्या