कु.अंकीताताई हर्षवर्धन पाटील यांना साद फाऊंडेशन चा 'इंदापुर भुषण' पुरस्कार जाहीर.
राजकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी साठी पुरस्कार जाहीर.
इंदापुर: साद फाऊंडेशन, इंदापूर (रजि.) या बहुउद्देशीय संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने मानाचा राजकीय क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या अंकीता ताई यांचा "इंदापूरभुषण" पुरस्कार देऊन गौरव वालचंदनगर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. दिलीपजी पवार साहेब यांच्या हस्ते ६ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता नऊदारे (जंक्शन- वालचंदनगर रोड) येथे करण्यात आला.
यावेळी सुरवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरज वनसाळे यांनी प्रास्ताविक केले तर अंकीताताई पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार साहेब यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितांमध्ये लासुर्णे गावचे ग्रामपंचायत सदस्य संतोष लोंढे, ग्रामपंचायत सदस्य दिपक लोंढे, सिध्दार्थ भोसले, अंथुर्णेचे माजी उपसरपंच संजय वंचाळे, सविताताई राक्षे, पोलीस कॉन्स्टेबल साळवे साहेब, शुभम सुर्वे, कदम सर, आबा बनसोडे, शरद गोतसुर्य, चैतन्य बनसोडे, आकाश भोसले, अनिल बनसोडे, बी. एम. कांबळे सर, सदाशिव सुर्यगंध सर, सौरभ धनवडे, ऋतुज वनसाळे, गोपी जावीर व असंख्य मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साद फाऊंडेशन चे अध्यक्ष सुरज वनसाळे, संस्थेचे ट्रस्टी आप्पा कदम, नागेश भोसले, दत्तात्रय राक्षे, अनिल केंगार, कोमल वनसाळे, योगिता भोसले, सचिन माने, अजय फले, बापुसाहेब जाधव यांनी परिश्रम घेतले. आभार बी. एम. कांबळे सर यांनी मानले.


