महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

माझ्या महाराष्ट्र साठी मी रक्तदान करणार; सौ.रिता बाविस्कर यांनी केले रक्तदान शिबिराचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन
माझ्या महाराष्ट्र साठी मी रक्तदान करणार; सौ.रिता बाविस्कर यांनी केले रक्तदान शिबिराचे आयोजन
April 15, 2021 12:06 PM ago Jalgaon, Maharashtra, India

अमळनेर, जळगाव : राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभाग नेहमीच समाजाप्रती आपले कर्तव्य ओळखून काम करीत असतो. कोविड काळात राज्यात रक्त पुरवठा कमी पडताच देशाचे नेते तसेच मा. खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आवाहनानुसार तसेच मा. नामदार श्री जयवंतरावजी पाटील साहेब यांच्या सूचनेने राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्या वतीने अमळनेर येथे मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

राज्यात पुढील काळातही मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचे आयोजन व्हावे. तसेच कोविड सारख्या महामारीत समाजाप्रती आपले उत्तरदायित्व ओळखून प्रत्येकाने आपआपले कर्तव्य करावे असेही आवाहन यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. उमेश दादा पाटील यांनी रक्तदान केले. तसेच अमळनेर संघाचे आमदार श्री. अनिल भाईदास पाटील, ग्रंथालय विभागाच्या प्रदेश समन्वयक तसेच प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य, महिला आघाडी च्या सौ. रिताताई बाविस्कर, श्री. अंकूश ज्ञानेश्वर भागवत (जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी जळगाव), युवक शहरध्यक्ष ईम्रान खाटीक, अल्पसंख्याक शहरध्यक्ष रफिक शेख, शहर उपाध्यक्ष मुशिर शेख, शहर कार्याध्यक्ष युवक श्री. उमेश सोनार धुळे, ग.स. बॅंक संचालक श्री. भुपेंद्र बाविस्कर, महिला तालुका अध्यक्षा सौ. योजना ताई पाटील जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष, ग्रंथालय विभाग श्री.नरेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ग्रंथालय विभाग, जळगाव श्री. संभाजी पाटील वडगाव, श्री. गजेंद्र साळुंखे, युवक जिल्हा उपाध्यक्ष श्री.निनाद शिसोदे, श्री. मनोज शिंगाणे, शरीफभाई, युवक पदाधिकारी श्री. दर्पण वाघ, शहरध्यक्ष श्री. रणजित पाटील, श्री. अरुणजी शिंदे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी सोशल मिडीया राहुल गोत्राळ, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सोशल डीस्टनसींग चे पालन करीत उपस्थित होते.

या रक्तदान शिबिराचे आयोजन सौ.रिता बाविस्कर यांनी केले होते. यावेळी त्यांनी ग्रंथालय विभाग सेल, तसेच खा. सौ. सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील यांचे आभार मानले.

रक्तदान शिबीराला नवयुवकांचा प्रचंड प्रतिसाद.

याप्रसंगी रिताताईंचे चिरंजीव ललित बाविस्कर यांनी देखील पहिल्यांदा रक्तदानाचा हक्क बजाविला तसेच ललितच्या मित्रांनीही पहिल्यांदा रक्तदान केले. त्याप्रसंगी श्री. योगेश सोनार, श्री. भुषण ठाकुर, श्री. भटु लोहार, श्री. कल्पेश बारी, श्री. रोहित ताबंट, श्री. प्रशात काटे, शारुख पठाण, पप्पु पठाण, श्री. दिपक बाविस्कर, दिपक पाटील, श्री.नथ्थु पौर, श्री. निलेश पाटील, श्री. गुलशन कुमार पारधी, श्री. अभिषेक शिंपी, श्री.शुभम बोरसे, चि. भुवन्य पाटील, चि. प्रतीक बोरसे, श्री. चिणमय पाटील, चि. कृणाल चौधरी, चि. भाग्येश पाटील, श्री. विजय पाटील, श्री. रोहित सोनवणे तसेच मोठ्या प्रमाणात युवकांना रक्तदान करून मोलाचे सहकार्य केले.

संबधित बातम्या