महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

विना अनुदानित शिक्षकांच्या वेतनाच्या मागण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनास महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था महामंडळ चा जाहीर पाठिंबा.

विनाअनुदानित शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर.
विना अनुदानित शिक्षकांच्या वेतनाच्या मागण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनास महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था महामंडळ चा जाहीर पाठिंबा.
March 09, 2021 10:00 PM ago Hingoli, Maharashtra, India

विना अनुदानित विद्यालयातील शिक्षक खुप वर्षे विनावेतन अध्यापनाचे इनामेइतबारे काम करीत असुन त्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटलाच पाहीजे. त्यासाठी राज्यस्तरीय विनाअनुदानित शिक्षकांनी एकत्र येवुन याविषयावर शासनाला जाब विचारणे गरजेचे आहे. - श्री सुनिल एन.ठाकरे, माध्यमिक शिक्षक. म.ज्यो.फुले विद्यालय, कळमनुरी.जी.हिंगोली

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील नामांकित आणि गुणवत्ता पूर्ण संस्था म्हणून मराठवाड्यात परिचित असणाऱ्या हुतात्मा बहिर्जी स्मारक शिक्षण संस्था वापटी च्या वतीने विनाअनुदानित विद्यालयातील शिक्षकांच्या वेतनासाठी केलेल्या घंटानाद आंदोलनात सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला.

या प्रसंगी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष साखर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सहकार क्षेत्रातील जाणकार नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री व संस्थेचे मार्गदर्शक मा.श्री जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब यांच्या सूचनेनुसार संस्थेचे सचिव तथा अभ्यासू व्यक्तिमत्व श्री पंडितराव देशमुख(माजी आमदार) यांनी शालेय परिसरात स्वतः सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला आहे.

या निमित्याने संस्थेचे विविध पदाधिकारी आणि अनुदानित/विनाअनुदानित शिक्षक बांधव उपस्थित होते. या पाठिंब्यामुळे आमची संस्था हि सदैव कर्मचाऱ्याच्या पाठीशी ठाम उभी असते याचा प्रत्यय पुन्हा एकदा बघावयास मिळाला आहे.

या कृतीने संस्थेतील विनाअनुदानित शिक्षकांना एक आशा मिळाली आहे. असाच उपक्रम महाराष्ट्रातील तमाम शिक्षण संस्था चालकांनी राबिवला पाहिजे अशी माफक अपेक्षा व्यक्त करून खऱ्या अर्थाने पालकत्व सिद्ध करावे ही जाहीर मागणी या परिपत्रकाद्वारे व्यक्त करून सन्माननीय संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात येत आहे.

संबधित बातम्या